Next
गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासाठी पुण्यात पहिले पाऊल
प्रेस रिलीज
Saturday, February 02, 2019 | 05:47 PM
15 0 0
Share this article:पुणे : पुण्यातील जुन्या इमारतींच्या, गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासाठी गंगोत्री ग्रीनबिल्ड या संस्थेकडून  ‘टुगेदर वी बिल्ड’ ही व्यावसायिक सल्ला सेवा सुरू करण्यात  आली आहे.

या संदर्भात माहिती देण्यासाठी, तसेच पुण्यातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंबंधी सद्यस्थिती सांगण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या सल्लासेवेमुळे पुनर्विकासात गृहनिर्माण संस्थांना जास्तीचे फायदे मिळणार आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या या पत्रकार परिषदेला गंगोत्री ग्रीनबिल्डचे संचालक गणेश जाधव, राजेंद्र आवटे, मकरंद केळकर उपस्थित होते.

पुण्यात पाच हजारांहून अधिक गृहनिर्माण संस्थांच्या इमारती ३० वर्षांहून जुन्या आहेत. जुने बांधकाम, पार्किंगची अपुरी व्यवस्था, लिफ्ट नसणे, देखभाल खर्च यांमुळे पुनर्विकासाची आवश्यकता निर्माण झाली आहे. वाढीव ‘एफएसआय’चे गणित फायदेशीर नसल्याने, अनेकदा विकसकांनी दिलेला प्रस्ताव पुरेसा न वाटल्याने, पारदर्शकतेवर शंका घेतली जात असल्याने या गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास रखडतो; तसेच विविध शासकीय शुल्क व भांडवल उभारणीचा मोठा खर्च यांमुळे पुनर्विकास प्रक्रिया किफायतशीर होत नाही. अशा वेळी स्वयं पुनर्विकास हा पर्याय गृहनिर्माण संस्थापुढे आहे.

सभासदांना तांत्रिक माहिती नसणे, वेळ, अनुभव नसणे यांमुळे पुनर्विकास अवघड होतो. या सर्व पार्श्वभूमीवर  गंगोत्री ग्रीनबिल्ड या बांधकाम क्षेत्रातील संस्थेकडून गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासाठी ‘टुगेदर वी बिल्ड’ ही व्यावसायिक सल्ला सेवा सुरू करण्यात आली आहे.   

पुनर्विकासाची किफायतशीरता (फिजिबिलिटी) सांगणे, भांडवल उभारणीत मदत, पालिकेकडून आराखडे मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करणे, कंत्राटदारांची नियुक्ती करून उत्तम दर्जाचे काम करणे, सदनिका विक्री व्यवहार सांभाळणे, ‘रेरा’सारख्या कायद्यांची पूर्तता करणे अशा अनेक सेवा एकत्रितपणे एका छताखाली या सल्ला सेवेद्वारे दिल्या जाणार आहेत.

‘या सल्ला सेवेचा फायदा गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना आणि नवीन सदनिका विकत घेणाऱ्या ग्राहकांनाही होणार आहे. पारदर्शकपणे पुनर्विकास होणे हा गृहनिर्माण संस्था आणि सभासदांना मिळणारा लाभ असेल, चांगल्या दर्जाचे बांधकाम मिळेल, वेळेची बचत होईल,’ असे या वेळी गंगोत्री ग्रीनबिल्डकडून सांगण्यात आले.

‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ला प्रकल्प व्यवस्थापन, बांधकाम, सदनिका विक्री यांचा प्रदीर्घ अनुभव असल्याने ही सल्ला सेवा सुरुकेली आहे. संस्थेचे पुण्यातील एरंडवणा, कोथरूड, सहकार नगर, कात्रज आदी भागात पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत.

हेल्पलाइन क्रमांक : ८८८८८ ३६५६४
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search