Next
‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या माजी विद्यार्थ्यांचा शनिवारी मेळावा
संस्थेच्या रजतजयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम
BOI
Thursday, December 20, 2018 | 04:42 PM
15 0 0
Share this story


पुणे : येथील ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (एआयटी) माजी विद्यार्थ्यांचा मेळावा येत्या शनिवारी, २२ डिसेंबर रोजी संस्थेच्या दिघी कॅंपस येथे होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या मेळाव्याला ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ने जगभरातील माजी विद्यार्थ्यांना निमंत्रित केले आहे. या मेळाव्यात उत्तम यश मिळविलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून, विविध संत्रांमधून विचारांचे आदानप्रदान होईल; तसेच काही खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. 

२२ डिसेंबरला सकाळच्या सत्रात यशस्वी उद्योजक विमल राठोड आणि अंकुश तिवारी हे ज्येष्ठ माजी विद्यार्थी सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी खुली चर्चा करतील. मुख्य सत्रात रवीन जानू संयुक्त राष्ट्रसंघात उपलब्ध असलेल्या कामाच्या विविध संधींची माहिती देतील. २००१ च्या बॅचचे विद्यार्थी मुकेश शुक्ला यांनी वेअर हाउस मॅनेजमेंट विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होईल. संस्थेच्या प्रगतीबद्दल संचालक ब्रिगेडिअर अभय भट माहिती देतील, तर प्रा. मनोज खळदकर माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्याबद्दल बोलतील. 

कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे माजी विद्यार्थी हे तिचे ब्रँड अॅम्बेसेडर असतात. या नामवंत संस्थेचे माजी विद्यार्थी जगात सर्वत्र संस्थेचे प्रतिनिधित्व करतातच; पण एकमेकांच्या संपर्कात राहून जुने संबंध दृढ करत संस्थेला सध्याच्या स्पर्धात्मक जगाशी जोडण्याचे काम करतात. असा माजी विद्यार्थी मेळावा भरविण्याची प्रथा वर्ष २००० मध्ये  सुरू झाली. या वर्षी हा १८ वा माजी विद्यार्थी मेळावा आणि संस्थेचा रजत जयंती महोत्सव बरोबरीने साजरे होत आहेत. 

माजी विद्यार्थ्यांच्या उद्योगजगतात असलेल्या संबंधांमुळे मायक्रोसॉफ्ट, गुगल, आय. एन. ए. बेअरिंग्ज, जॉन डीअर, डेलॉइट अशा नामवंत कंपन्या संस्थेच्या कॅंपसमध्ये येऊन नोकरी साठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतात. 

संस्थेची पहिली तुकडी १९९८ साली पदवी घेऊन बाहेर पडली. सुरुवातीला विद्यार्थ्यांचा मुख्यतः संरक्षण दलात भरती होण्याकडे कल होता; परंतु २००० नंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांनी  कॉर्पोरेट आणि उद्योग क्षेत्रात नाव कमावण्यास सुरुवात केली. सैन्यातील वातावरणात वाढलेल्या आणि त्यामुळे सभोवतालच्या स्थितीशी जुळवून घेणे, सकारात्मक वृत्ती, उत्तम संपर्क कौशल्य अशा वैविध्य क्षमता असलेल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना उद्योगजगतात उत्तम मागणी असते. एआयटीचे माजी विद्यार्थी समाजसेवेतही कार्यरत असून, सेवाभावी संस्थांसाठी काम करतात; तसेच उदयोन्मुख तरुणांना मार्गदर्शन करतात आणि साहसी क्रीडा प्रकारातही हिरीरीने भाग घेतात. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link