Next
पुण्यात ‘एसीआर ट्रेंडस’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, October 08 | 02:38 PM
15 0 0
Share this story

पुणे : इंडियन सोसायटी ऑफ हिटींग रेफ्रिजरेटींग एअरकंडिशनिंग इंजिनिअर्स (आयएसएचआरएई) पुणे चॅप्टरतर्फे पुण्यात ‘एसीआर ट्रेंडस’ ही दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी हॉटेल शेरटन ग्रँड येथे सकाळी ९.३० ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे.  

‘या राष्ट्रीय परिषदेचे हे चौदावे वर्ष असून, यामध्ये पहिल्या दिवशी एचव्हीएसी तंत्रज्ञानामधील कल व  दुसऱ्या दिवशी इंडस्ट्रीयल रेफ्रिजरेशन या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा हे पहिल्या दिवशी तर प्रख्यात रेफ्रिजरेशन सल्लागार आर. पी. परांजपे हे दुसऱ्या दिवशी बीजभाषण करतील’,अशी माहिती आयएसएचआरएई पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सूरज रानडे, प्रेसिडेंट इलेक्ट नंदकिशोर माटोडे, समन्वयक दीपक वाणी व सहसमन्वयक अमिषा मदान यांनी दिली.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link