Next
माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, August 06, 2018 | 04:18 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : युनिव्हर्सल मराठी आणि रितंभरा विश्व विद्यापीठाच्या मालिनी किशोर संघवी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून, यंदा हा महोत्सव मुंबईच्या जुहू किनाऱ्याजवळील मालिनी किशोर संघवी शांतीप्रभा प्रेक्षागृहात होणार आहे.

फेस्टिवलच्या आयोजनात युनिव्हर्सल मराठी टीमसोबत मालिनी किशोर संघवी कॉलेजातील बीएमएम विभागाचा फिल्म क्लब सक्रिय भूमिका बजावत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लघुपटांचे स्क्रिनिंग, मान्यवरांचे चर्चासत्र, प्रश्नोत्तरे आणि विविध विषयांवरील कार्यशाळा होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरांवर होणाऱ्या या महोत्सवासाठी लघुपटकारांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

या महोत्सवासाठी लघुपटांच्या विविध वर्गवारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सामाजिक जनजागृती शॉर्ट फिल्म (सोशल अवेरनेस), आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म (विदेशी फिल्म), अॅनिमेशनपट, कल्पनारम्य (फिक्शन) फिल्म, जाहिरातपट (अॅडफिल्म), संगीतपट (म्युझिक व्हिडियो) आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) अशा या सात वर्गवारीसाठी विनामूल्य ऑनलाइन प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१८ आहे.

समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचे मूल्य जपणाऱ्या या महोत्सवाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आजवर जगातील पाच उपखंड, ५०हून अधिक देश आणि तीन हजारांहून अधिक लघुपटांचा प्रतिसाद मिळाला आहे. आजवर विविध देशातील लघुपटकारांनी प्रत्यक्ष फेस्टिवलची मजा लुटली आहे. युनिव्हर्सल मराठीच्या लघुपट चळवळीला लोकल ते ग्लोबल मिळणारा प्रतिसाद हे या फेस्टिवलचे वैशिष्ट्य आहे.  

संकल्पनारचनावादी ठरलेल्या या महोत्सवामध्ये चित्रपट सृष्टीतल्या मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभणार असून, लघुपटकारांना विविध विषयांवर चर्चा आणि प्रश्नोत्तरांची संधी मिळणार आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या लघुपटांचे परीक्षण या क्षेत्रातील तज्ञांकडून केले जाईल. तीन दिवसीय महोत्सवात निवडक लघुपटांचे स्क्रिनिंग केले जाईल. प्रत्येक लघुपट वर्गवारीतून प्रत्येकी एक ‘बेस्ट शॉर्टफिल्म’ विजेता आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना वैयक्तिक तांत्रिक अॅवॉर्ड (टेक्निकल अॅवॉर्ड) देऊन गौरविण्यात येईल. लघुपट वर्गवारीतील विजेत्यांना रोख रक्कम आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येईल.

नावनोंदणीसाठी वेबसाइट : www.mmisff.com
अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६८९ ३०८५३, ९९६९४ १२४२६, ९८१९५ ३०५६९.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search