Next
‘शाओमी’तर्फे रेडमी मालिका भारतात सादर
प्रेस रिलीज
Tuesday, September 11, 2018 | 03:31 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : शाओमी या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या स्मार्टफोन ब्रॅंडने रेडमी सिक्स, रेडमी सिक्स ए आणि रेडमी सिक्स प्रो हे स्मार्टफोन्स भारतात सादर केले.

‘रेडमी सिक्स प्रो’मध्ये एआय ड्युअल कॅमेरा आणि दोन दिवस चालणारी बॅटरी असून, ‘रेडमी सिक्स’ आणि ‘रेडमी सिक्स ए’मध्ये अनुक्रमे हेलिओ पी२२ आणि हेलिओ ए२२ असे चिपसेट्स आहेत. यामुळे या विभागात १२ एनएम प्रोसेसची नव्याने सुरुवात झाली आहे.

‘रेडमी सिक्स ए’ हा ‘रेडमी फाइव्ह ए’ या स्मार्टफोनचा पुढील टप्पा आहे. २०१८ सालच्या दुसऱ्या तिमाहीत सलग सात महिने सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन म्हणून ‘फाइव्ह ए’ची नोंद झाली होती. आयडीसीच्या आकडेवारीनुसार, २०१८च्या दुसऱ्या तिमाहीत या फोनची ३० लाख युनिट्स आयात करण्यात आली. काउंटरपॉइंट रिसर्चच्या मते ‘रेडमी फाइव्ह ए’ची नोंद मार्च २०१८मध्ये जगातील सर्वाधिक विक्रीचा अॅंड्रॉइड फोन म्हणूनही झाली होती.

शाओमी इंडियाच्या कॅटेगरी आणि ऑनलाइन विक्री विभागाचे प्रमुख रघु रेड्डी म्हणाले, ‘शाओमीमध्ये आम्ही कायमच आमच्या चौकटी पार करून सर्व वापरकर्त्यांना अधिक उच्चस्तरीय कल्पकतेचे उत्पादन वाजवी दराला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आलो आहोत. आमचे तत्त्वज्ञान खऱ्या अर्थाने प्रस्थापित करणारी ‘रेडमी सिक्स ए’, ‘रेडमी सिक्स’ आणि ‘रेडमी सिक्स प्रो’ ही उत्पादने आणताना आम्हाला अभिमान वाटत आहे. १२ एनएस आर्किटेक्चरने युक्त असे या विभागातील एकमेव स्मार्टफोन्स ‘रेडमी सिक्स ए’ आणि ‘रेडमी सिक्स’ त्यांच्या कामगिरीच्या जोरावर बाजारपेठेतील परंपरा कायम राखतील. एआय ड्युअल कॅमेरा आणि आश्चर्यकारक अशा दोन दिवस चालणाऱ्या बॅटरीने युक्त असा ‘रेडमी सिक्स प्रो’ म्हणजे, शाओमी सर्वोत्तम तपशील आणि सर्वोच्च दर्जा वाजवी किंमतीला देऊ करण्यास किती महत्त्व देत आहे, याचे आणखी एक उदाहरण आहे.’

पाच हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असलेला ‘रेडमी सिक्स ए’ची रचना व स्क्रीन रेडमी सिक्ससारखेच आहे. यामध्ये हेलिओ ए२२ एसओसी असून, यामुळे १२ एनएम प्रोसेसरने युक्त असा ‘रेडमी सिक्स ए’ या दरश्रेणीतील एकमेव स्मार्टफोन ठरला आहे. ‘रेडमी सिक्स ए’ची तीन हजार एम-एएच शक्तीची बॅटरी दिवसभर चालू शकते. त्याचप्रमाणे हा फोन स्टॅंड-बाय मोडवर नऊ दिवसांपर्यंत सुरू राहू शकतो.

‘रेडमी सिक्स ए’मध्ये १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असून फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशनची सुविधा आहे. या फोनमधील फ्रंट कॅमेरा पाच मेगापिक्सलचा असून, शाओमीच्या एआय पोट्रेट मोडचा वापर करण्याची क्षमता दोन्ही कॅमेरांमध्ये आहे. ‘रेडमी सिक्स ए’ अॅंड्रॉइड ओवर आधारित एमआययूआय ९.६ने युक्त असून, या कार्यप्रणालीने अॅप्सचा मेमरी वापर सुमारे ३० टक्क्यांनी कमी केला आहे.

वेगवान अनलॉकिंगसाठी ‘रेडमी सिक्स ए’मध्ये एआय फेस अनलॉक सुविधा आहे. हे आणखी सोयीस्कर करण्यासाठी वापरकर्ते रेझ टू वेक ही सुविधा एनेबल करण्याचा पर्यायही निवडू शकतात. ‘रेडमी सिक्स’मध्येही ड्युअल स्लिम स्लॉट्सह डेडिकेटेड मायक्रोएसडी स्लॉट आहे. याशिवाय ड्युअल व्होल्ट क्षमताही आहे.

सध्या हा स्मार्टफोन अॅंड्रॉइड ओरिओवर आधारित ‘एमआययुआय ९.६’ ही कार्यप्रणाली चालवत आहे; मात्र येत्या काही महिन्यात तो ‘एमआययुआय १०’वर अपग्रेड होईल. ‘रेडमी सिक्स ए’ दोन जीबी + १६ जीबी पाच हजार ९९९ रुपयांना आणि दोन जीबी + ३२ जीबी सहा ९९९ रुपये अशा दोन प्रकारांत उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search