Next
पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे महिलांसाठी स्मार्ट स्वच्छतागृह
प्रेस रिलीज
Monday, September 11, 2017 | 05:59 PM
15 0 0
Share this article:

पिंपरी-चिंचवड :  स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात महिलांसाठी कासारवाडी येथे स्मार्ट स्वच्छतागृह उभारण्यात येत आहे.
शहरात महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा अभाव होता.भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याची मागणी लावून धरली होती. त्याला यश येऊन पालिकेने शहरात महिलांसाठी स्मार्ट स्वच्छतागृहाची उभारणी सुरू केली आहे.

 शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या आसपास  आहे तरीही महिलांसाठी स्वच्छतागृहे अत्यंत अल्प प्रमाणात आहेत. सार्वजनिक मुताऱ्याही कमी प्रमाणात आहेत. अनेक ठिकाणी या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. जुनी स्वच्छतागृहे पाडली जात आहेत. शहराचा सर्वांगिण विकास होत असताना,महिलांच्या स्वच्छतागृहाचा विसर महापालिका प्रशासनाला पडला होता. याबाबत भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता शहरात महिला स्वच्छतागृहे उभारण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्‍त होत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search