Next
विवेक चूडामणी म्हणजे शहाणे रत्न
BOI
Friday, December 21 | 10:10 AM
15 0 0
Share this story

सनातन वैदिक धर्माचा प्रचार करणाऱ्या आद्य शंकराचार्यांनी अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात अनेक मोठे ग्रंथ लिहिले. भारतभर प्रचार करून अनेकांना शास्त्र चर्चेत पराभूत केले. यातील काही पंडितांची त्यांनी स्थापन केलेल्या चार प्रमुख मठांवर नियुक्ती केली. या मठांद्वारे सनातन धर्माचे कार्य पुढे सुरू ठेवले. शंकराचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये ‘विवेकचूडामणी’ हा ग्रंथ साधना व संक्षिप्त, योग्य व सम्यक ज्ञान मिळविण्यासाठी श्रेष्ठ आहे, असे सांगत डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी ‘विवेक चूडामणी म्हणजे शहाणे रत्न’मधून या ग्रंथाचे सोपे मराठी रूपांतर केले आहे.  

‘विवेकचूडामणी’ या ग्रंथात संस्कृतमध्ये ५८० कडवी श्लोकांच्या रूपात आहेत. गुरू-शिष्य संवाद असे त्याचे स्वरूप आहे. यातून गुरू ‘आत्म्या’बद्दलचे विवरण शिष्याला सांगत आहे. गुरूची लक्षणे, आत्म्याचे घटक, स्वतःला कसे ओळखावे हे यात शिकविले आहे. ध्यानाचे प्रकार, आत्मनिरीक्षण याबद्दल सुचवून जीवनमुक्तीची लक्षणे सांगितली आहेत. या आधी आदी शंकराचार्य यांचा जीवनपट थोडक्यात वर्णन केला आहे.  

पुस्तक : विवेक चूडामणी म्हणजे शहाणे रत्न
लेखक : डॉ. पांडुरंग कुलकर्णी
प्रकाशक : दीर्घायु इंटरनॅशनल
पाने : १३४
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link