Next
रंगूनवाला​ दंत रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
प्रेस रिलीज
Monday, July 16, 2018 | 04:08 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील ​एम. ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अ‍ॅंड रिसर्च सेंटरमध्ये नुकतीच २१ वर्षीय तरुणीच्या जबड्याच्या सांध्यातील ट्युमरवरील दुर्मिळ अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. ​रंगूनवाला​ दंत रुग्णालयातील ओरल अ‍ॅंड मॅक्सिलोफेशिअलचे विभाग प्रमुख डॉ. जे. बी. गार्डे यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी केली होती.​ ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे रिपोर्ट आले आहेत.

यास्मिन ​शेख असे या तरुणीचे नाव असून, ती मूळची जम्मू-काश्मीर येथील सीमेवर उरी सेक्टर भागात भारतीय लष्कराच्याजवळ राहते. या ​दुर्मिळ​ शस्त्रक्रियेमध्ये डॉ. गार्डे​ यांना डॉ. हर्षल भागवत, डॉ. गौरव खुटवड, डॉ. मनिषा बिजलानी, रंगूनवाला डेंटल सायन्सेस महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, इनामदार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकिय संचालक डॉ. परवेझ इनामदार, रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमणदीप दुग्गल आर. ए. शेख यांनी ​ही ​शस्त्रक्रिया​ विनामूल्य करण्यासाठी चमूला ​​प्रोत्साहन दिले. डॉ. गार्डे यांनी ही शस्त्रक्रिया विना​ मानधनाने केली.

‘​रूग्णाचा उजव्या बाजूचा जबडा हा ट्युमरमुळे मोठा झाला होता. रुग्णाच्या जबड्याच्या सांध्यात (Temporomandibular Joint) ट्युमर झाला होता. ही गाठ काढण्यात आली व कॉस्मॅटिक सर्जरी करून वाढलेले खालच्या जबड्याचे हाड कमी केले गेले’, असे डॉ. गार्डे ​​यांनी सांगितले.

‘​वयाच्या १५व्या वर्षी यास्मिनचा चेहरा जबड्यामुळे वाकडा होत असल्याचे लक्षात आले. जम्मू-काश्मीर, श्रीनगर येथील अनेक हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेस प्रतिसाद मिळत नव्हता; परंतु जम्मू-काश्मीरमधील ‘असीम फाउंडेशन’ या काश्मीरमध्ये शैक्षणिक, सामाजिक, रोजगार निर्मितीचे काम करणार्‍या पुण्यातील तरुणांच्या संघटनेच्या बेकरीत काम करणार्‍या ​यास्मिनला न्याय मिळवून देण्याचे संघटनेने ठरवले. या संघटनेने पुण्यातील दंतचिकित्सक डॉ. संजय करवडे आणि ऑर्थोपेडिक डॉ. मिलिंद मोडक यांना याबाबत कळवले. या दोघांनी डॉ. जे. बी. गार्डे​​ यांना रुग्ण समस्येबाबत माहिती देताच डॉक्टरांनी या दुर्मिळ शस्त्रक्रियेस होकार दिला. त्यामुळे आमच्या मुलीस नवीन जीवन मिळाले’, अशी माहिती ​यास्मिनच्या पालकांनी दिली. यामध्ये ‘असीम फाऊंडेशन’च्या निरूता किल्लेदार आणि सई बर्वे यांनी खूप सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

असीम फाउंडेशन ही भारतातील सीमावर्ती भागात विशेषत: जम्मू-काश्मीर राज्यात कार्यरत असलेली संस्था आहे. दहा वर्षांहून अधिक काळ संस्थेचे हे काम सुरू आहे. ही संस्था प्रामुख्याने जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नागरिकांमध्ये संवाद, विश्‍वास आणि विकासाचे काम करते. जम्मू-काश्मीर राज्यात उरी येथे अ‍ॅपल वॉलनट कुकीजच्या निर्मितीसाठी महिलांसाठी बेकरी सुरू करण्यात आली आहे. या बेकरीमध्ये यास्मिन कार्यरत आहे. पुण्यातील युवक नोकऱ्या करून पगाराचा काही भाग संस्थेला देऊन सामाजिक उपक्रम करतात. संस्थेचे संस्थापक सारंग गोसावी आहेत.

‘ओरल अ‍ॅंड मॅक्सिलोफेशिअल सर्जन म्हणून ​डॉ. गार्डे ​पुण्यात गेली २० वर्षे कार्यरत आहे​त​. ​त्यांचे ​सातारा रोड येथे अ‍ॅडव्हान्स्ड डेंटल क्लिनिक आहे. ​सामाजिक बांधिलकीतून त्यांनी आजवर अनेक शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या आहेत.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link