Next
पुण्यात नवीन वर्षात धावणार सौर ऊर्जेवरील रिक्षा
प्रेस रिलीज
Saturday, December 16 | 06:38 PM
15 0 0
Share this story

‘सोलर - ई-रिक्षा’ सादर करताना आर-सन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रणजित मोरे
पुणे : येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक मोबिलिटी हेच भविष्य असणार आहे.याची जाणीव झाल्याने, वाहन उत्पादक कंपन्या आता अपारंपरिक उर्जेवर चालणाऱ्या वाहन निर्मितीवर भर देत आहेत. दुचाकींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात आता नवीन वर्षात सौर उर्जेवर चालणाऱ्या रिक्षा, व्यावसायिक वाहने पाहायला मिळणार आहेत. 

‘आर-सन इंडस्ट्रीजचे ऑटोमोबाईल डिव्हिजन असलेल्या सनलेक्ट्रा ऑटोतर्फे जानेवारी अखेरपर्यंत ‘सोलर - ई-रिक्षा’ दाखल करण्यात येणार आहे. हे उत्पादन निर्मितीच्या अंतिम टप्प्यात असून नुकत्याच वेस्टीन येथे झालेल्या एआरएआय-आयटेक इव्हेंटमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. ही वाहने बॅटरी ऑपरेटेड असून यामध्ये सोलर रूफचा समावेश आहे’. अशी माहिती  आर-सन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रणजित मोरे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘आपल्याला पारंपरिक पध्दतीने इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये वाहतुकीची सवय आहे, पण हवामानातील बदल याचाही निर्णायक परिणाम दिसून येत असतो. त्यामुळे आता विद्युत वाहनांवर भर देण्यात येत आहे. सरकारही वायू प्रदूषण कमी करणाऱ्या पर्यायी इंधनावरील वाहनांना प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या  निर्मितीला चालना मिळत आहे. आम्ही इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सौर उर्जेचा पर्याय विकसित करून अत्यंत किफायतशीर किंमतीतील आणि कमी देखभाल खर्च असलेली वाहने निर्माण केली आहेत.  सौर विद्युत वाहनांपासून ते मोठ्या औद्योगिक उत्पादनांपर्यंत आम्ही सुर्यप्रकाशाभिमुख संपूर्ण अशी परिसंस्था उभारत आहोत.

ते पुढे म्हणाले, नवीन सादर करण्यात येणाऱ्या दोन प्रकारातील रिक्षा फक्त इकोफ्रेंडलीच नसून त्यामध्ये विविध प्रकाराची वैशिष्ट्ये पाहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये आकर्षक रचना, आरामदायीपणा,उच्च कार्यक्षमता व गुणवत्ता यांचा समावेश आहे. फायटर हे प्रवासी वाहन असून, बाऊन्सर हे कार्गो प्रकारातील आहे. सोलर रूफमुळे अधिक उर्जाबचत होण्यास मदत होणार आहे. त्याची किंमत सध्याच्या रिक्षांपेक्षा कमी आहे. फायटर हे पॅसेंजर वाहन एक लाख ३० हजार रुपये किमतीत तर फायटर हे वाहन ८५ हजार रुपयामध्ये उपलब्ध असेल. सौर उर्जा अभावाच्या काळात थेट इलेक्ट्रिक चार्जिंगची सोय आहे. मोठ्या टाउनशिप्स, शैक्षणिक संस्था अशा ठिकाणी या वाहनांचा उत्तम उपयोग होऊ शकतो. प्रदूषण होत नसल्याने पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त साधन आहे. त्याचबरोबर इंधनावर खर्च होणारे प्रचंड परकीय चलन वाचवणेही शक्य होईल. विनागिअरचे वाहन असल्याने चालवणे सोपे आहे. त्यामुळे महिलांनाही याचा फायदा होईल.महिला उद्योजाकातेलाही यामुळे चालना मिळेल’. 

‘ही बाजारपेठ दरवर्षी ३० ते ३५ टक्के वेगाने वाढत आहे. दरवर्षी आठ लाख वाहनांची मागणी असते. त्यामानाने उत्पादन खूप कमी आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठी संधी आहे. आम्ही रुद्रपुर येथे उत्पादन केंद्र स्थापन केले असून सध्या पहिल्या वर्षी सहा हजार वाहनांची निर्मिती करण्याची क्षमता आहे. दुसऱ्या वर्षी ती तीस हजारापर्यंत वाढवण्याची योजना आहे’, असे ही मोरे यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link