Next
‘झाशीच्या राणीचा पराक्रम एकमेवाद्वितीय’
कशेळीच्या शाळेत जयंतीनिमित्त कार्यक्रम
BOI
Monday, November 26, 2018 | 10:41 AM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
‘राणी लक्ष्मीबाईंचे जीवन झुंजार होते. त्यांचा पराक्रम एकमेवाद्वितीय असा होता. त्या अश्वपारखी, युद्धविशारद होत्या,’ अशा शब्दांत निवृत्त गटविकास अधिकारी शिवाजीराव माने यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र कथन केले. झाशीच्या राणीची जयंती नुकतीच (१९ नोव्हेंबर) झाली. त्यानिमित्त रत्नागिरीच्या कऱ्हाडे ब्राह्मण संघाने कशेळीतील शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कशेळी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील ‘सुयोग विकास विद्यामंदिर, जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक’मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वांसाठीच सूर्यनमस्कार ही सुयोग्य आराधना आहे, असेही माने यांनी सांगितले.सुरुवातीला सरस्वती पूजन करून राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन झाल्यानंतर मुलींनी श्रवणीय कनकादित्य स्तुती व स्वागतगीत सादर केले. त्यानंतर शाळेतर्फे व कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी संघाचा उद्देश व कार्य यांची माहिती दिली. आसपासच्या शाळांमधील विद्यार्थिनींच्या क्रीडा व कला विषयातील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातील विजेत्या मुलींना या कार्यक्रमावेळी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. शाळेने स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मुख्याध्यापक आशिष सावंत व सहकाऱ्यांचे संघातर्फे कौतुक करण्यात आले.कवी भा. रा. तांबे यांचे ‘रे हिंदबांधवा, थांब या स्थळीं अश्रु दोन ढाळीं,  ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली’ हे गीत या वेळी विद्यार्थिनींनी गायले. कार्यक्रमाला कनकादित्य मंदिराचे विश्वस्त अप्पा ओळकर, सरपंच श्री. गुरव, कर्हांडे ब्राह्मण संघाचे सदस्य सीए सी. यू. हळबे, दिलीप ढवळे, मानस देसाई, प्रतिभा प्रभुदेसाई, सेक्रेटरी शिल्पा पळसुलेदेसाई, डॉ. शरद प्रभुदेसाई, डॉ. श्रीकृष्ण जोशी, कशेळीचे ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते.

(राणी लक्ष्मीबाईंची कर्मभूमी असलेल्या झाशीबद्दलची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा. राणी लक्ष्मीबाईंना जेथे वीरगती प्राप्त झाली, त्या ग्वाल्हेरमध्ये त्यांचे स्मारक आहे. त्याबद्दलची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link