Next
‘रियलमी’ मोबाइलला युवा पिढीची पसंती
दोन लाखांपेक्षा अधिक ‘रियलमी थ्री’ची विक्री
प्रेस रिलीज
Saturday, March 16, 2019 | 03:02 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ‘आजच्या तरुण पिढीला माफक किंमतीत अधिकाधिक नाविन्यपूर्ण फीचर्सने सुसज्ज मोबाइलची अपेक्षा असते. त्यांची ही अपेक्षा रियलमी मोबाइल पूर्ण करत असल्याने युवा पिढीत हे फोन वेगाने लोकप्रिय होत आहेत. युवा पिढीच्या अपेक्षा पूर्ण करणारे अत्याधुनिक मोबाइल आणण्यावर आम्ही भर दिला आहे. त्याचा अपेक्षित परिणाम आम्हाला दिसत आहे,’ असे रियलमी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी सांगितले. 

‘कंपनीने नऊ महिन्यात तब्बल ५० लाख मोबाइल विकले असून, साधारण दहा हजार रुपये किंमतीचे हे फोन आहेत. ३५ शहरांमध्ये ३०० रिटेलर्सच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांपर्यंत पोहोचली असून ऑनलाईन माध्यमातून मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. ऑनलाईन विक्रीचे प्रमाण ८० टक्के, तर २० टक्के विक्री रिटेलर्सच्या माध्यमातून होते. भारतातील मध्यम किंमतीच्या मोबाइल श्रेणीतील एकूण बाजारपेठेचा ७.५ टक्के हिस्सा ‘रियलमी’ ने काबीज केला असून, देशातील चौथ्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे,’ असेही सेठ यांनी सांगितले. 

रियलमी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ

‘ग्राहकांना किफायतशीर किंमतीत मोबाइल फोन उपलब्ध व्हावेत यासाठी कंपनीने इ कॉमर्स माध्यमातून विक्री करण्यावर भर दिला असून, रिटेलर्सला द्यावे लागणारे मार्जिन ग्राहकांना देऊन, त्यांना माफक किंमतीत फोन उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे धोरण आहे. जे रिटेलर्स कमी मार्जिन घेऊन ग्राहककेंद्री सेवा देतील त्यांना कंपनी आपल्या वितरण जाळ्यात सहभागी करून घेईल. रिटेलर्सच्या कमी प्रमाणामुळे ऑफलाईन विक्रीवर परिणाम होत असला, तरी ग्राहकांना माफक किंमतीत फोन उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याने त्याबाबत कंपनी काळजी करत नाही. ऑनलाईन माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यावर कंपनीचा भर देत आहे,’ असे सेठ यांनी स्पष्ट केले. 

कंपनीने नुकताच ‘रियलमी ३’ हा मोबाइल फोन दाखल केला असून, मंगळवार, १३ मार्च रोजी याची ऑनलाईन सेलद्वारे विक्री करण्यात आली. दोनच फेऱ्यांमध्ये कंपनीने तब्बल दोन लाख दहा हजार युनिट्सची विक्री केली आहे. आता १९ मार्च रोजी फ्लिपकार्ट आणि रियलमी डॉट कॉमच्या माध्यमातून याची विक्री करण्यात येणार आहे. 

तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेजची सुविधा असलेला ‘रियलमी ३’ आठ हजार ९९९ रुपये किंमतीत, तर चार जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज क्षमतेचा ‘रियलमी ३’ दहा हजार ९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. काळा आणि डायनॅमिक काळा अशा दोन रंगात हा फोन उपलब्ध आहे. 

याचे निळ्या रंगातील मॉडेल २६ मार्च रोजी आयोजित होणाऱ्या सेलमध्ये प्रथम दाखल करण्यात येणार आहे. ओप्पो कंपनीचा किफायतशीर किंमतीतील फोनसाठीचा हा रियलमी ब्रँड अल्पावधीतच भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय ठरला आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link