Next
‘ओएलएक्स’वरील अनबॉक्स गाड्यांमध्ये वाढ
प्रेस रिलीज
Wednesday, October 24 | 05:28 PM
15 0 0
Share this story

मुंबई : केवळ दोन वर्षांहून कमी काळ वापरलेल्या गाड्यांच्या (अनबॉक्स्ड कार्स) संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचा अहवाल ‘ओएलएक्स’ ऑटोमोबाइल रिपोर्टच्या दुसऱ्या आवृत्तीत सादर करण्यात आला आहे. २०१७च्या तुलनेत अनबॉक्स गाड्यांमध्ये यावर्षी १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जानेवारी ते ऑगस्ट २०१७ या काळात ‘ओएलएक्स’च्या यादीत १.१ लाख गाड्या होत्या. जानेवारी ते ऑगस्ट २०१८ या काळात ही संख्या १.३ लाखांवर गेली आहे. विशेष म्हणजे, २०१८मध्ये या प्रकारच्या गाड्यांसाठी ग्राहकांकडून येणाऱ्या चौकशीत ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या हा नागरी ट्रेंड असला, तरी येत्या काही महिन्यांतच द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमध्येही हा ट्रेंड पसरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

प्रीमिअम गाड्यांच्या विभागातील वाढ ही या ट्रेंडचा भक्कम पुरावा आहे. सणासुदीच्या काळात पूर्व मालकीच्या गाड्यांच्या विक्रीत याच विभागाचा वरचष्मा असण्याची शक्यता आहे. ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडिज या प्रीमिअम ब्रँडच्या लिस्टिंगमध्ये २०१८मध्ये ४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात एसयूव्हीने सेदानला मागे टाकले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link