Next
‘रेनो’कडून ‘क्विड’वर नव्याने वॉरंटी ऑफर
प्रेस रिलीज
Wednesday, April 18 | 02:27 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ‘रेनो’ हा भारतातील युरोपियन ऑटोमोटिव्ह ब्रॅंड असून, त्यांनी त्यांच्या ‘रेनो क्विड’ या आधुनिक चारचाकीवर रोड साईड असिस्टन्ससोबतच चार वर्षे किंवा एक लाख किलोमीटर अशी अत्याधुनिक फर्स्ट वॉरंटी देत असल्याचे जाहीर केले आहे. यात दोन वर्षे किंवा ५० हजार किमीच्या स्टॅंडर्ड वॉरंटीसह दोन वर्षे किंवा ५० हजार किमीच्या एक्सटेंडेड वॉरंटीचा समावेश आहे. यातून ‘रेनो क्विड’च्या मूल्यवर्धनावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होत असून ग्राहकांना वहनमालकीचा विनादिक्कत अनुभव यावा यासाठी या खास ऑफर देण्यात येत आहेत.

‘रेनो क्विड’ ही चारचाकी आधुनिक चारचाकींच्या बाजारपेठेतली गेम-चेंजर बनली असून, ‘रेनो इंडिया’च्या व्यापारवृद्धीतही या गाडीचा मोलाचा वाटा आहे. सुरू झाल्यापासून रेनोची आजवर २.२ लाख वाहनांची विक्री झाली आहे. सर्वांसाठी दळणवळण सहजसाध्य करण्याच्या ‘रेनो’च्या धोरणात्मक वैशिष्ट्यावर ‘रेनो क्विड’च्या सादरीकरणामुळे शिक्कामोर्तब झाला असून, आंतरराष्ट्रीय वृद्धी धोरणालाही यामुळे चालना मिळाली. ०.८ एल, १.० एल एमटी, १.० एल एएमटी आणि क्लायम्बर इतकी मोठी रेंज असलेल्या ‘रेनो क्विड’ या ब्रॅंडमुळे जागतिक संशोधनाच्या विश्वात शाश्वत कामगिरी करून लाईफसायकल प्लानमधील उत्पादनाच्या माध्यमातून स्थानिकांच्या गरजा भागवण्याच्या ‘रेनो’च्या उद्दिष्टाचेही स्पष्टीकरण झाले आहे.

याहीपुढे जाऊन, ‘रेनो इंडिया’ या कंपनीने रेनो सिक्युअर उपक्रमांतर्गत (वाढीव वाहन वॉरंटी आणि रोड साईड असिस्टन्स) आकर्षक ऑफर्स सादर केल्या आहेत. ग्राहक आता वाढीव वॉरंटी पाच वर्षांपर्यंत व एक लाख किमीपर्यंत (आधी जे साध्य होईल ते) वाढवून घेऊ शकणार असून, यासोबतच कॅप्चर, क्विड, डस्टर आणि लॉजी या ‘रेनो इंडिया’ चारचाकींवर रोड साईड असिस्टन्स देण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांत, भारतात मजबूत व्यापार स्थापन करण्यावर ‘रेनो’चा भर दिसून येतो. मजबूत अशा ‘क्विड’च्या उत्पादनाभिमुख धोरणासह नुकत्याच सादर करण्यात आलेल्या एसयूव्ही, कॅप्चरच्या मदतीने उत्पादन, नेटवर्क व्याप्ती, ग्राहकाभिमुख उपक्रम आणि अनेक कल्पक विपणन उपक्रमांतून ग्राहक समाधान संपादन करून ‘रेनो’ सर्वांगीण धोरणविकास करीत असल्याचेही जाणवते आहे.

आपल्या ग्राहकांना विनादिक्कत ब्रॅंड मालकीचा अनुभव देण्यासाठी ‘रेनो इंडिया’तर्फे अनेक अत्याधुनिक विक्रीपश्चात उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत. यात रेनो सिक्युअर, रेनो असिस्ट, वर्कशॉप ऑन व्हिल्स (डब्ल्यूओडब्ल्यू), पॅशन ऑन व्हिल्स (पीओडब्ल्यू), कस्टमर अॅप्स आणि नियमित ग्राहकसेवा शिबिरे आदी उपक्रमांचा समावेश होतो. भारतकेंद्री मजबूत उत्पादन धोरणासह, सतत बदलत राहणाऱ्या ग्राहकनिवडीशी जुळवून घेण्यासाठी ‘रेनो’ने आधुनिक योजना आखल्या असून, भारतीय बाजारपेठेशी दीर्घकालीन नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी नवीन ग्राहकांनाही हसतमुखाने ‘रेनो’ कुटुंबात समाविष्ट करून घेण्यात येते.

‘रेनो इंडिया’विषयी :

रेनो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही फ्रान्सस्थित ‘रेनो एसएएस’ या कंपनीची संपूर्णतः मालकीची उपकंपनी आहे. ‘रेनो इंडिया’च्या चारचाकींचे उत्पादन चेन्नई येथील ओरागडम येथील उत्पादन केंद्रात होत असून, दर वर्षी चार लाख ८० हजारांहून अधिक गाड्या उत्पादित करण्याची या केंद्राची क्षमता आहे. सध्या ‘रेनो इंडिया’ या कंपनीची देशभरात ३२०हून अधिक विक्री केंद्रे व २६९हून अधिक सेवाकेंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांतून उत्पादन व सेवांचा दर्जा कायम राखला जातो.

‘रेनो इंडिया’ या कंपनीच्या उत्पादन व सेवेला ग्राहकांकडून, तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नावाजले गेले असून, आजवर ६०हून अधिक पुरस्कार या कंपनीला मिळाले आहेत. केवळ एका वर्षात जास्तीत जास्त पुरस्कार मिळवलेली ‘रेनो इंडिया’ ही एकमेव कंपनी आहे. ‘रेनो क्विड’ या गाडीला आजवर ३२ पुरस्कार मिळाले असून दहा वेळा ‘कार ऑफ द इअर’ या पुरस्काराचा यात समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link