Next
‘टेक्नोसोसायटल– २०१८’ तंत्रपरिषदेचे पंढरपुरात आयोजन
BOI
Thursday, December 06, 2018 | 01:15 PM
15 0 0
Share this article:

पंढरपूर : ‘‘टेक्नोसोसायटल-२०१८’ या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे येत्या १४ आणि १५ डिसेंबर २०१८ या दोन दिवशी पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (स्वेरी) आयोजन करण्यात आले आहे. देशातून आणि परदेशातूनही अनेक संशोधक, शास्त्रज्ञ या परिषदेला उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन. एस. कागदे, विश्वस्त दादासाहेब रोंगे, तंत्रपरिषदेचे समन्वयक डॉ. प्रशांत पवार यांच्यासह ‘स्वेरी’अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.

 ‘ही परिषद संशोधकांना तंत्रज्ञानातून सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रेरित करेल. या आंतरराष्ट्रीय परिषदेस भारत सरकारच्या बी. आर. एन. एस., डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी,तसेच ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या संस्थांचे संशोधन अनुदान प्राप्त झाले आहे. या परिषदेसाठीच्या तयारीचे काम आता अंतिम टप्यात आले असून, शोधनिबंध सादरीकरणासाठी सहा स्वतंत्र हॉल उभारण्यात आले आहेत’, असे रोंगे यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, ‘संशोधन (रिसर्च) क्षेत्रातसुद्धा ‘स्वेरी’ आघाडीवर आहे. समाजोपयोगी उपक्रमासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध विद्याशाखांना संशोधनाच्या माध्यमातून एकाच छताखाली आणण्याचे ऐतिहासिक कार्य या तंत्रपरिषदेद्वारे पार पाडले जाणार आहे. सामाजिक प्रगतीसाठी सुरू असलेल्या संशोधनाला प्रकाशात आणण्याचे काम ही परिषद करणार आहे. या परिषदेत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजाच्या सकारात्मक बदलाच्या संधी विकसित करणे, तंत्रज्ञानाचे सामान्य जनांसाठी प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष ग्रामीण भागात तंत्रज्ञान राबविताना येणाऱ्या अडचणी, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाबरोबर आपल्या संकल्पनांची देवाण घेवाण, संशोधनासाठी आवश्यक निधी, सुयोग्य मार्गदर्शन इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन व चर्चा होणार आहे.’


‘या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे उद्घाटन भारताच्या पहिल्या लाइट कॉम्बॅट एअरक्राप्ट या विमानाचे मुख्य डिझायनर पद्मश्री डॉ. कोटा हरीनारायण यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस आहेत. मुख्य मार्गदर्शक म्हणून इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे प्रा. डॉ. डॅनियल स्टीन स्त्रा लाभले आहेत; तसेच बल्गेरियातील सोफिया विद्यापीठाचे डॉ. व्हजरनिस व डॉ. मारिया नेनोवा, इस्रायलमधील मुक्त विद्यापीठाचे डॅना हरारी, अमेरिकेतील साउथ डाकोटा विद्यापीठाचे डॉ. संतोष के. सी., पिठाडीया फाउंडेशनचे चेअरमन दिलीप पिठाडीया व टेक्सास ए अँड एम विद्यापीठाच्या टिस सेंटरचे संचालक डॉ. सतीश बुक्कापटणम, केनियामधील नैरोबी विद्यापीठातील थॉमस मबुया, जर्मनीचे भारतातील इंडो-जर्मन कन्सल्टंट अरमीन हक, बेंगलोरमधील आय. आय. एस. सी. संस्थेचे डॉ. के. राजन्ना व प्रा. जे.एम. चंदरकिशन, बी. ए. आर. सी. संस्थेचे हेमंत सोड्डे, डॉ. गुलशन रेलहान, डॉ. आर. बालसुब्रमण्यम व रमाकांत राथ, महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे डॉ. अजित पाटणकर व डॉ. व्ही. व्ही. महाजनी, पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीमधील डॉ. दिनेश सिंग ठाकूर, मुंबई आयआयटीचे डॉ. वरदराज बापट, इंडस्ट्रियल एक्स्पर्ट बी. एच. श्रीनाथ हे ही मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला देश-विदेशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोनशे सत्तरहून अधिक शोधनिबंध या परिषदेसाठी संकलित झाले आहेत. हे शोधनिबंध ‘स्प्रिंगर’ प्रकाशनाकडून पुस्तक स्वरूपात प्रकाशित होणार आहेत.’ 

‘या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे संस्थेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध वाढतील व संशोधनामध्ये वाढ होईल. या परिषदेदरम्यान विविध नामांकित देशी, परदेशी संस्थांशी सामंजस्य करार होणार असून, ते समाजोपयोगी ठरतील. यापूर्वी झालेल्या ‘टेक्नोसोसायटल-२०१६’ परिषदेतील शोधनिबंधांच्या ‘स्प्रिंगर’ने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेतून आतापर्यंत छत्तीस हजारांहून जास्त वेळा शोधनिबंध डाउनलोड झाले आहेत. या परिषदेसाठी मायक्रो नॅनो संशोधन, सोलार, बायोडिझेल व सॅटेलाइट तंत्रज्ञानावर आधारित लक्षवेधी ठरतील असे शोधनिबंध जमा झाले आहेत,’ अशी माहिती परिषदेचे समन्वयक डॉ. प्रशांत पवार यांनी दिली.

‘ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना उच्च तंत्रशिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत होते. त्यासाठी आर्थिक संकटांना त्यांना तोंड द्यावे लागत होते. हे लक्षात आल्यावरग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता १९९८ मध्ये श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर अर्थात ‘स्वेरी’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. अभियांत्रिकी, फार्मसीचे पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी ,तसेच एमबीए, पीएचडी अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना पुण्या-मुंबईला जाण्याची आवश्यकता भासत नाही. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी तयार केलेली ‘शिक्षण पंढरी’ ही योजना भारतात सर्वप्रथम ‘स्वेरी’मध्ये राबवण्यात आली. संशोधन क्षेत्रातदेखील ‘स्वेरी’ आघाडीवर असून, भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (BARC) संयुक्त विद्यमाने पायाभूत सुविधा गरीब शेतकऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत नेल्या आहेत,’ असे डॉ. रोंगे यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search