Next
शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक डेस्क
BOI
Friday, August 17 | 04:15 PM
15 0 0
Share this story


मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त वांद्रे येथील सुपारी टँक महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर असे नवेकोरे डेस्क आणि खुर्च्या मिळाल्या. विशेष म्हणजे हे फर्निचर चक्क पुठ्ठ्याच्या कार्टनपासून बनवण्यात आले आहे. पुनर्वापरावर भर देणाऱ्या टेट्रापॅक कंपनीने आपल्या पुठ्ठ्याच्या कार्टनपासून हे डेस्क बनवले आहेत. यामुळे पुनर्वापर अर्थात ‘रिसायकलिंग’चे महत्त्वही अधोरेखित झाले आहे. 

सुपारी टँक महापालिका शाळा या बीएमसीच्या एकमेव शाळेत वापरलेली कार्टन देण्यासाठी जमा केंद्र चालवण्यात येते. येथील विद्यार्थी आणि कर्मचारी नियमितपणे रिसायकल करण्यासाठी लोकांकडून वापरलेली कार्टन जमा करत असतात. 

‘टेट्रापॅक इंडिया’ कंपनीतर्फे गेल्या आठ वर्षांपासून मुंबईतील पुठ्ठ्याच्या कार्टनच्या रिसायकलिंगचा प्रसार करण्यात येत आहे. ‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ या उपक्रमाचा भाग म्हणून त्यांनी शाळेला फर्निचरचे दहा सेट भेट दिले आहेत. मुंबईकरांनी वापरलेले टेट्रा पॅक कंपनीच्या शहरभरात असलेल्या केंद्रावर जमा करावेत यासाठी या उपक्रमाअंतर्गत प्रोत्साहन दिले जात आहे, या जमा झालेल्या पॅकचे रिसायकलिंग करून डेस्क,  वह्या, छप्परावर घालायचे कागद आणि अनेक गोष्टी बनवल्या जातात.

वांद्रे येथील सुपारी टँक महापालिकेच्या शाळेला टेट्रा पॅकने बनवलेले   डेस्क प्रदान करण्यात आले. या वेळी सहाय्यक आयुक्त शरद उघाडे,  जयदीप गोखले, प्राचार्या माधुरी डिसुझा आणि विद्यार्थी
बृहन्मुंबई महापालिकेच्या एच- वेस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त शरद उघाडे यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्राचार्या माधुरी डिसूझा यांच्याकडे ही भेट सोपवण्यात आली. या वेळी उघाडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले, तसेच हा उपक्रम मुंबईतील सर्व शाळांमध्ये राबवला जावा, अशी इच्छाही व्यक्त केली, यासाठी शक्य ती सर्व मदत करण्याचे वचनही त्यांनी दिले.

‘गेल्या आठ वर्षांपासून आम्ही नियमितपणे पॅक जमा करणे आणि मुंबईतील आमच्या पुठ्ठ्यांच्या कार्टनसाठी रिसायकल योजना राबवणे असे कार्य करत आहोत. यासाठी आम्ही १८० जमा केंद्रे तयार केली आहेत. मुंबईकरांनी येथे त्यांच्याकडील टेट्रा पॅक आणून जमा करावेत यासाठी त्यांना प्रोत्साहनही देत आहोत. यातून आम्ही नागरिकांच्या वतीने काही वंचित गटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी २६० पेक्षा जास्त डेस्कची भेट देऊ शकलो आहोत. मुंबईतील लोकांचा सातत्यपूर्ण पाठिंबा मिळत असल्याने आम्ही शाळांसाठी मोठ्या प्रमाणावर कार्य करू शकलो आणि सकारात्मक पर्यावरणपूरक चळवळ उभी करू शकलो आहोत,’ असे टेट्रापॅकचे साउथ आणि साउथ इस्ट एशियाचे कम्युनिकेशन्स संचालक जयदीप गोखले म्हणाले.

‘आमच्या शाळेत मनापासून काम करणारे शिक्षक आणि मेहनती विद्यार्थी आहेत. टेट्रा पॅकचे हे उत्पादन पर्यावरणपूरक आहेच. यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सवयींचे महत्त्व स्वतः बघता आले आहे. विद्यार्थ्यांना स्वतःला याचे महत्त्व कळावे, तसा बदल करता यावा, पर्यावरणासाठी हातभार लागावा; तसेच आमच्याप्रमाणे इतर शाळांसाठीही डेस्क उभे करता यावेत यासाठी मदत करता यावी, म्हणून आम्ही विद्यार्थी आणि शिक्षकांना वापरलेली कार्टन जमा करण्यासाठी प्रोत्साहन देतो’, असे शाळाच्या प्राचार्या माधुरी डिसुझा म्हणाल्या.

‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ हा ‘टेट्रापॅक इंडिया’च्या २०१० मध्ये सुरू झालेल्या ‘गो ग्रीन’ उपक्रमातील प्रमुख उपक्रम आहे. हा उपक्रम ‘रिलायन्स रिटेल’बरोबर संयुक्तपणे चालवला जातो. भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन टेट्रा पॅकपैकी एक पॅक रिसायकल होतो. यासाठी रिलायन्स रिटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी वापरलेली कार्टन जमा करण्यासाठी केंद्रे उपलब्ध करून दिली आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link