Next
परिचारिका दिनानिमित्त ‘रूबी’तर्फे परिचारिकांचा सत्कार
BOI
Friday, May 10, 2019 | 05:00 PM
15 0 0
Share this article:

परिचारिका दिनानिमित्त हॉस्पिटलबरोबर ५० वर्षे पूर्ण केलेल्या नर्सिंग सुपरिटेंडंट एलिझाबेथ सायमन यांचा सत्कार करताना डॉ. आर. बी. गुलाटी व अन्य मान्यवर.

पुणे : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त रूबी हॉल क्लिनिकतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हॉस्पिटलबरोबर ५० वर्षे पूर्ण केलेल्या नर्सिंग सुपरिटेंडंट एलिझाबेथ सायमन यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर ४४ वर्षे पूर्ण करणाऱ्या अॅमिनी वर्गिस व २९ वर्षे पूर्ण करणाऱ्या एलिझाबेथ डॉसन यांचादेखील सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेंट अँड्रयुज नर्सिंग कॉलेजच्या निवृत्त अधिष्ठाता ब्रिगेडियर जॅनेट, रूबी हॉल क्लिनिकमधील विश्वस्त व वरिष्ठ हदयरोग तज्ज्ञ डॉ. आर. बी. गुलाटी, मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. किशोर पुजारी, रूबी हॉल क्लिनिकच्या लॅबोरेटरी विभागाच्या संचालिका डॉ. नीता मुन्शी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पोस्टर स्पर्धेचे निकालही जाहीर करण्यात आले.

दर वर्षी १२ मे रोजी फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय नर्सेस डे साजरा करण्यात येतो. या वर्षीची संकल्पना ‘नर्सिंग-बॅलन्स ऑफ माइंड, बॉडी अँड स्पिरिट’ ही आहे.

या वेळी बोलताना सेंट अॅ न्ड्रयुज नर्सिंग कॉलेजच्या निवृत्त अधिष्ठाता ब्रिगेडियर जॅनेट म्हणाल्या, ‘परिचारिका या रूग्णांच्या संपर्कात येणारे पहिले वैद्यकीय कर्मचारी असतात. या क्षेत्रात आमचा दृष्टीकोन व्यक्तीकेंद्रित असतो आणि विविध प्रकारच्या सेवा आम्ही देतो. उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आमचे कौशल्य आणि समर्पण हे महत्त्वाचे असते.’

 रूबी हॉल क्लिनिकच्या नर्सिंग सेवा विभागाच्या संचालिका लेफ्टनंट कर्नल सी. सी. क्रुझ म्हणाल्या,‘आजारी लोकांना परत बरे होऊन घरी जाताना बघताना आम्हाला अत्यंत समाधान व आनंद मिळतो. रूग्ण व कुटुंबकेंद्रित उत्कृष्ट सेवा देण्यासाठी कटिबध्द असलेल्या रूबी हॉल क्लिनिकमधील प्रेरणादायी परिचारिकांचे नेतृत्व करताना मला आनंद वाटतो.’

रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय नर्सेस डे हा वर्षातील ३६५ दिवस व दिवसातले २४ तास अविरत सेवा व धैर्य दर्शविणाऱ्या परिचारिकांच्या कार्याचा सन्मान करण्याची एक संधी असते. एक रूग्णकेंद्रित संस्था म्हणून आम्ही रूग्णांच्या सुरक्षिततेसाठी कटिबध्द आहोत आणि यामध्ये परिचारिका या महत्त्वाची भूमिका बजावत एक आधारस्तंभ असतात. रूग्णांना गुणवत्तापूर्ण व अविरत सेवा देण्याची परिचारिकांची वचनबध्दता ही प्रेरणादायी आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search