Next
‘इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पुनर्वापराला प्रोत्साहन आवश्यक’
प्रेस रिलीज
Thursday, December 07 | 06:07 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘संगणक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील वस्तूंच्या पुनर्वापराला प्रोत्साहन दिल्यास पर्यावरणाचे अनेक प्रश्न कमी होण्यास मदत होईल’, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले.  

कॉम्प्युटर्स अँड मिडिया डीलर्स असोसिएशनतर्फे ‘आयटी एक्स्पो २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोच्या उद्घाटनानंतर फडणवीस यांनी ‘ई-वेस्ट कलेक्शन सेंटर’ला भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या एक्स्पोमध्ये भेट देणाऱ्या नागरिकांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक वेस्ट’ची माहिती देण्यासाठी माहिती आणि संकलन केंद्र सुरू केल्याची माहिती आनंद कॉम्प्युटर्स सिस्टिम्सचे संचालक संजय भंडारी यांनी दिली. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या एक्स्पोच्या प्रवेशद्वारावरच हे संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाची मान्यताप्राप्त ‘ई-वेस्ट एजन्सी’ असलेल्या ‘आनंद’च्या माहिती आणि संकलन केंद्रात इलेक्ट्रॉनिक कचरा, पुनर्वापर याबद्दल माहिती दिली जात असून, नागरिकांनी आणलेले ‘ई-वेस्ट’ स्वीकारले जात आहे. ‘भारतात दरवर्षी ५० मेट्रिक टन ‘ई-वेस्ट’ तयार होत असून, पर्यावरण जपण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साहित्यातून पुनर्वापर करणे हा एक प्रभावी उपाय आहे,’ असे यावेळी सांगण्यात आले.

नागरिक, आस्थापना आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना ‘ई-वेस्ट’बद्दल असलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी, संकलनासाठी हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली असून  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आयटी एक्स्पोविषयी :
कालावधी : सात ते ११ डिसेंबर
वेळ : सकाळी १० ते रात्री ८
स्थळ : कृषी महाविद्यालय मैदान, पुणे
हेल्पलाइन क्रमांक : ९३७१० १५३७३
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link