Next
शिर्डी येथे सहकार संवाद कार्यशाळा उत्साहात
BOI
Monday, March 04, 2019 | 12:38 PM
15 0 0
Share this article:

अॅड. दीपक पटवर्धनरत्नागिरी : महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व सहकार आयुक्त कार्यालय यांच्या वतीने शिर्डी येथे नुकतेच सहकार सवांद कार्यशाळेचे आयोजन केले होते. सहकारी पतसंस्था चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते प्रतिनिधी व सहकार आयुक्त श्री. सोनी व सर्व अधिकारी तसेच सहाय्यक निबंधक या वेळी उपस्थित होते. पतसंस्था चळवळ अधिक गतिमान, अधिक भक्कम पायांवर उभी करण्यासाठी जागृत राहून काम करण्याचे आवाहन सहकार आयुक्तांनी या प्रसंगी केले.

या सवांद कार्यक्रमात राज्य पतसंस्था फेडरेशनचे तज्ञ संचालक व येथील स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सहकार कायद्यात नव्याने समाविष्ट झालेल्या ११ व्या प्रकरणातील कायदेशीर तरतुदी आणि पतसंस्थावर त्यांचा होणारा परिणाम या बाबत अभ्यासपूर्ण विवेचन करत नवीन कायद्याची परिभाषा विशद केली. पतसंस्थांसाठी गठीत होणारे नियामक मंडळ, स्थिरता व तरलता सहाय्यता निधी, रोख व वैधानिक तरलतेचे प्रमाण, शीघ्र तरल कर्जे तसेच पतसंस्थांवर व्यापार न करण्यावर तसेच सभासदांव्यतिरिक्त व्यवहार न करणे या संदर्भातील महत्त्वपूर्ण तरतुदींवर भाष्य करून प्रतिनिधींना नवीन कायद्यातील तरतुदींसंदर्भात अवगत केले.

नव्या कायद्यात तरलतेचे प्रमाण, बचत गटाच्या वस्तूंची खरेदी–विक्री ‘₹’ प्रमाणपत्राने ताब्यात आलेल्या मिळकतींची विल्हेवाट तसेच संचालकांना रितसर मानधन प्राप्त व्हावे यासाठी पोटनियमातील तरतुदींसंदर्भात आयुक्तांचे लक्ष वेधण्याचे काम अॅड. पटवर्धन यांनी या वेळी केले. ‘नवा कायदा बदल पतसंस्थांना अधिक शिस्त व स्थिरता यासाठी प्रभावी ठरेल,’ असेही अॅड. पटवर्धन यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, अतिरिक्त आयुक्त डॉ. खंडागळे, उपनिबंधक श्री. सोबळे, नाशिकचे विभागीय उपनिबंधक तसेच लेखा विभागिय उपनिबंधक यांच्यासह फेडरेशनचे पदाधिकारी व संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.

पतसंस्थेच्या शंका, समाधान अॅपचे अनावरण
पतसंस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी व पतसंस्थांना अचूक मार्गदशन मिळण्यासाठी फेडरेशनने नवे अॅप विकसित केले असून, या अॅपवर आपले प्रश्न नोंदवून त्याची उत्तरे आणि मार्गदर्शन दोन तासांत संस्थांना प्राप्त होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून १५ हजार पतसंस्थांना शंका, समाधानासाठी हे अॅप वरदान ठरणार आहे. यात फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, फेडरेशनचे तज्ञ संचालक अॅड. दीपक पटवर्धन व बँकिग तज्ञ गणेश निमकर हे या अॅपवरील प्रश्नांची उत्तरे तात्काळ देऊन मार्गदर्शन करणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search