Next
दादा धर्माधिकारी, फिलिप बॅरी
BOI
Monday, June 18, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

प्रसिद्ध सर्वोदयी विचारवंत आणि लेखक दादा धर्माधिकारी आणि ‘फिलाडेल्फिया स्टोरी’ या नाटकामुळे लोकप्रियता मिळालेला नाटककार फिलीप बॅरी यांचा १८ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
..... 
शंकर त्र्यंबक धर्माधिकारी 

१८ जून १८९९ रोजी बेतुलमध्ये (मध्य प्रदेश) जन्मलेले शंकर त्र्यंबक ऊर्फ दादा धर्माधिकारी हे सर्वोदयी विचारवंत, दर्शनशास्त्राचे लेखक आणि वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचं घराणं वेदविद्येत पारंगत होतं. त्यांनी स्वतः एक वर्षभर श्रीशंकराचार्यांच्या वेदान्तिक कृतींचा सखोल अभ्यास केला होता. गांधीजींच्या प्रेरणेने त्यांनी असहकार आंदोलनात भाग घेतला आणि पुढे सर्वोदय चळवळीत स्वतःला झोकून दिलं. मराठी, हिंदी, इंग्लिशखेरीज त्यांचं गुजराथी आणि बंगाली या भाषांवर प्रभुत्व होतं. ते भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य होते.

सर्वोदय-दर्शन, आपल्या गणराज्याची घडण, दादांच्या बोधकथा, क्रांतिवादी तरुणांनो, लोकशाही : विकास आणि भविष्य, नागरिक विश्वविद्यालय : एक परिकल्पना, स्त्री-पुरुष सहजीवन, मैत्री, तरुणाई, मानवनिष्ठ भारतीयता - असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

एक डिसेंबर १९८५ रोजी त्यांचं सेवाग्राममध्ये निधन झालं.

(दादा धर्माधिकारी यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
............

फिलिप बॅरी

१८ जून १८९६ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला फिलिप बॅरी हा नाटककार म्हणून प्रसिद्ध होता. ‘ऑटोनॉमी’ या त्याच्या पहिल्याच नाटकाला येल ड्रामॅटिक सोसायटीचं बक्षीस मिळालं होतं. पुढे त्याने त्या वेळी गाजलेल्या जॉर्ज बेकरच्या नाट्यलेखन-कार्यशाळेतून प्रशिक्षण घेऊन जोमाने नाट्यलेखनाला सुरुवात केली. त्याचं ‘यू अँड मी’ हे नाटक चांगलंच लोकप्रिय झालं होतं. पुढे वैवाहिक जीवनातल्या समस्या विनोदी शैलीत मांडणारी त्याची नाटकं लोकांना आवडत गेली आणि तो प्रसिद्ध झाला.
 
हॉलिडे, हॉटेल युनिव्हर्स, इन ए गार्डन, टुमॉरो अँड टुमॉरो, दी अॅनिमल किंग्डम, विदाउट लव्ह, फूलिश नोशन, ही त्याची नाटकं प्रसिद्ध आहेत. त्याचं तुफान गाजलेलं नाटक म्हणजे ‘दी फिलाडेल्फिया स्टोरी.’ याच्यावरच पुढे कॅरी ग्रॅन्ट, जेम्स स्ट्युअर्ट आणि कॅथरीन हेपबर्नचा सुंदर सिनेमा आला होता.

तीन डिसेंबर १९४९ रोजी त्याचा न्यूयॉर्कमध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link