Next
सिस्का समूहाचा वायर्स आणि केबल्सच्या क्षेत्रात प्रवेश
प्रेस रिलीज
Thursday, July 12, 2018 | 02:29 PM
15 0 0
Share this story

मुंबई : एलईडी लाईटिंग, मोबाईल अॅक्सेसरीज आणि पर्सनल केअरसंबंधी उपकरणांमध्ये मोठे यश प्राप्त केल्यानंतर सिस्का समूहाने आता वायर्स आणि केबल्स यांच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. या व्यवसायासाठी कंपनीने ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. 

सिस्कातर्फे अग्निरोधक आणि ‘लो स्मोक’  स्वरुपाच्या, पाऊण ते सहा चौरस मिमी जाडीच्या आणि ९०, १८० न ३०० मीटर लांबीच्या वायर्स सादर केल्या जाणार आहेत. कंपनीच्या सहाशे वितरकांचे जाळे देशभरात उपलब्ध आहे. एक लाखाहून अधिक रिटेल दुकानांमध्ये कंपनीचा माल ठेवला जातो. याचा उपयोग करून वायर्स व केबल्सच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे कंपनीने ठरवले आहे. सध्या पश्चिमेकडील राज्यांमध्ये या व्यवसायाची सुरुवात करून नंतर तो देशभरात नेण्याची कंपनीची योजना आहे. ‘मेक इन इंडिया’ या सरकारच्या योजनेस सहाय्य करण्याच्या उद्देशाने ‘सिस्का’ने हरयाणातील रेवारी येथे ७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून आपला चौथा कारखाना उभारला आहे.  येथे विविध प्रकारच्या वायर्स व केबल्सचे उत्पादन घेण्यात येईल. पहिल्या टप्प्यात तीनशे कामगार नेमण्यात येतील. २०१८ -१९ या आर्थिक वर्षात सिस्का वायर्स व केबल्स हा विभाग ५०० कोटींच्या महसुलाचे लक्ष्य गाठेल, अशी अपेक्षा आहे’, असे सिस्का समुहाचे संचालक राजेश उत्तमचंदानी यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले, ‘वायर्स व केबल्सच्या व्यवसायात मोठ्या संधी आम्हाला दिसत आहेत. देशात या व्यवसायाला १२ हजार कोटींची बाजारपेठ उपलब्ध आहे. वीज व उर्जा यांची गरज व पुरवठा देशात वाढणार असल्याने वायर्स व केबल्सची गरजही वाढणारच आहे. भारतात सध्या या व्यवसायात संघटीत उद्योगांचा फारसा शिरकाव झालेला नाही. त्यामुळे आम्हाला पुरेसा वाव आहे. देशातील जनतेला उत्तमदर्जाच्या वायर्स व केबल्स पुरविण्याचा आमचा निर्धार आहे. या उद्योगातून आम्ही रोजगार निर्मितीस चालना देऊन देशाच्या विकासात भर घालणार आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link