Next
सुबोधचा ‘विजेता’ प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा
सुभाष घई निर्मित चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित
BOI
Monday, July 01, 2019 | 05:47 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : बॉलीवूडमधील अनेक हीट चित्रपटांचे निर्माते सुभाष घई यांनी काही मराठी चित्रपटांचीही निर्मिती केली होती. आपल्या ‘मुक्ता आर्ट्स’तर्फे आता पुन्हा एकदा सुभाष घई ‘विजेता’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. सध्या गोव्यात सुरू असलेल्या ‘मराठी चित्रपट महोत्सवा’त या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे. गोव्यातील मराठी चित्रपट महोत्सवात गोव्याचे सांस्कृतिक आणि कला मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते विजेताच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याचे काही फोटो, निर्माते सुभाष घई यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत. २४ जानेवारी २०२२ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून येत्या ऑगस्ट महिन्यापासून चित्रपटाच्या चित्रिकरणाला प्रारंभ होणार आहे.

आजवर ‘वळू’, ‘समिता’, ‘सनई-चौघडे’ अशा मराठी चित्रपटांची निर्मिती घई यांनी केली होती. यापैकी ‘समिता’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. अमोल शेगटे यांनी ‘विजेता’ चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले असून रोहन-रोहन यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. 

अभिनेता सुबोध भावे याच्यासोबत नेहा महाजन, माधव देवचके, देवेंद्र चौगुले, सुशांत शेलार, मानसी कुलकर्णी, कृतिका तुलसकर, ललित सावंत, पूजा सावंत, पूजा बिश्त हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search