Next
‘बीएआय’ पुणेचा पदग्रहण समारंभ उत्साहात
प्रेस रिलीज
Tuesday, April 16, 2019 | 05:18 PM
15 0 0
Share this article:पुणे : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरचा (बीएआय) पदग्रहण समारंभ नुकताच रेसिडेन्सी क्लब येथे उत्साहात झाला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘बीएआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन चंद्रा, विशेष अतिथी व ‘बीएआय’चे उपाध्यक्ष (पश्‍चिम विभाग) निमेश पटेल, ‘बीएआय’चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रकाश पंजवाणी, ‘बीएआय’ पुणेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज देशमुख, मानद सचिव एस. बी. आपटे, उपाध्यक्ष अशोक अटकेकर, मानद खजिनदार ए. आर. गुजर, मावळते अध्यक्ष प्रदीप गर्गे, माजी उपाध्यक्ष रणजित मोरे, डॉ. आर. बी. कृष्णानी, प्रताप साळुंखे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या प्रसंगी ‘बीएआय’ पुणे सेंटरच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे आणि या क्षेत्रात रूची निर्माण व्हावी या हेतूने ‘बीएआय’ पुणेच्या युथ विंगचेदेखील उद्घाटन करण्यात आले.

या वेळी बोलताना चंद्रा म्हणाले, ‘मला अत्यंत आनंद होत आहे की, मी ‘बीएआय’च्या जन्मस्थनी म्हणजे पुणे येथे बोलत आहे. पुणे आणि पश्‍चिम विभागाची राष्ट्रीय पातळीवर मोठी भूमिका आणि जबाबदारी आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल घडत आहे; मात्र हे बदल होत असताना ‘बीएआय’ ही संस्था तेवढीच सक्षम होणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीने विविध स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकारी विभागांशी अधिक संवाद साधत या समस्या व प्रगतीबाबत अवगत करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सरकारबरोबर भागीदारी करत जबाबदारी उचलणे तेवढेच महत्त्वाचे आहे. पुढील १० वर्षांत ‘बीएआय’ या संस्थेला आपण कसे पाहतो त्यासाठी जास्तीत जास्त तरुणांना आणि त्यांच्या नवसंकल्पनांना समाविष्ट करणे गरजेचे आहे.’

नवीन नियमावलींमुळे आज बांधकाम उद्योग आव्हानात्मक टप्प्यातून जात आहे, आपल्या उद्योगावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून ‘बीएआय’ प्रयत्नशील असल्याचे पटेल यांनी नमूद केले.
 
‘आपल्या उद्योगात यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ ही दोन महत्त्वाची साधने आहेत. यंत्रांचे व्यवस्थापन सुयोग्यरित्या करता येते; मात्र आपल्याला या उद्योगात काम करणार्‍या श्रमिकांच्या कल्याणासाठी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे,’ असे पंजवाणी म्हणाले.

मावळते अध्यक्ष गर्गे, नवीन अध्यक्ष देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जयदीप राजे यांनी केले. मानद सचिव संजय आपटे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search