Next
वडाची रोपे लावून वटपौर्णिमा साजरी
BOI
Friday, June 29 | 12:39 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : श्री क्षेत्र अरण (ता. माढा, जि. सोलापूर) येथे विद्यार्थी, महिला आणि ग्रामस्थांनी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर वडाच्या रोपांची लागवड केली. वडाचे झाड म्हणजे ऑक्सिजनचा मोठा स्रोत असतो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची केवळ पूजा न करता वडाच्या रोपांची लागवड करून या ग्रामस्थांनी वेगळा पायंडा पाडला.

‘वडाचे झाड स्वतःबरोबर एक परिसंस्था तयार करते. या झाडाला वर्षात तीन वेळा फळे येतात. या झाडाच्या आसऱ्याला अनेक पक्षी व प्राणी वास करतात. म्हणून भारतीय सणाला वडाची पूजा बांधली जाते. अरण परिसरात झाडांची लागवड करणे, ती वाढविणे या कामासाठी हरितसेना नेहमीच अग्रेसर असते,’ असे उत्तमराव सावंत यांनी या वेळी सांगितले.

सामाजिक वनीकरण विभाग कुर्डुवाडी व अरण येथील संत सावतामाळी विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा वटवृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी प्राचार्य औदुंबर भांगे, पर्यवेक्षक सुरेश मोरे, दत्तात्रय ढगे, सावता घाडगे, सतीश घाडगे तानाजी इंगळे उपस्थित होते.

वडाच्या झाडांची संख्या वाढविण्यासाठी अरण व परिसरातील सार्वजनिक ठिकाणी या झाडांची लागवड व्हायला हवी, असे या वेळी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. वटपौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्षाची लागवड करण्यासाठी ज्योतिबा मंदिराच्या आवारात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शोभा घुगे, वैशाली बाबर, सविता बाबर, अर्चना कुलकर्णी यांच्या हस्ते वडाची पूजा करण्यात आली. या प्रसंगी महिलांना वडाची रोपे भेटही देण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरितसेना समन्वयक तानाजी इंगळे, अतुल लोखंडे व हरित सेनेचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link