Next
‘झी ५’ची नवीन वेबसीरिज प्रसारित
BOI
Wednesday, March 06, 2019 | 02:44 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : हिंदी, तमिळ, मराठी, तेलगू, बंगाली आणि मल्याळम या सहा भाषांमधील तब्बल ७२ शोज आगामी काळात ‘झी ५’वर येणार असल्याची घोषणा नुकतीच या मनोरंजक प्लॅटफॉर्मतर्फे करण्यात आली होती. यानंतर ‘सेक्स, ड्रग्ज अॅण्ड थिएटर’ ही नवी कोरी वेब सीरिज या प्लॅटफॉर्मवर सादर करण्यात आली आहे.

‘झी ५’ने नुकताच आपला पहिला वर्धापनदिन साजरा केला. यानिमित्ताने नवीन कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली होती. २०२०पर्यंत हे ७२ कार्यक्रम सादर होतील असेही सांगण्यात आले होते. ‘डेट विथ सई’, ‘लिफ्टमॅन’ आणि ‘वीरगती’ या यापूर्वी सादर झालेल्या वेब सीरिजना उत्तम प्रतिसाद मिळाला. या धर्तीवर ‘झी ५’ने आपली ही नवी कोरी वेब सीरिज सादर केली आहे. 

पाच मार्चला पुण्यातील एका कार्यक्रमात ‘सेक्स, ड्रग्ज अॅण्ड थिएटर’ ही वेबसीरिज सादर करण्यात आली. ही एक हाय व्होल्टेज ओरिजनल वेब सिरीज असून तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. या सिरीजमुळे मराठी ओरिजिनल्सची यादी अधिक बळकट करण्याच्या प्रयत्न करणार असल्याचे ‘झी ५’कडून सांगण्यात आले आहे. ही सीरिज १० भागांची आहे.

मिताली मयेकरराष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेल्या या कलाकृतीत अभिनेते प्रवीण तरडे, सुनील बर्वे, आदिश वैद्य, मिताली मयेकर, सुयश झुंझुरके, शाल्वा किंजवडेकर, नयना मुके, अभिषेक देशमुख आणि सुजय डहाके यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

(सेक्स, ड्रग्ज अॅण्ड थिएटर या वेबसीरिजची ओळख करून देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)  

                                                                                             
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search