Next
‘कोरेगाव-भीमाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील’
शौर्यदिनानिमित्त रामदास आठवले यांनी केले विजयस्तंभाला अभिवादन
प्रेस रिलीज
Wednesday, January 02, 2019 | 05:12 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने ६३ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यात वाढ करून कोरेगाव-भीमा विकास आराखडा १०० कोटींचा करण्यात यावा, तसेच विजयस्तंभ परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. याकामी केंद्र सरकारतर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल,’ असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

शौर्यदिनानिमित्त कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केल्यानंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते. विजयस्तंभाजवळ मराठा समाजाच्या सरपंचांकडून रामदास आठवले यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय सहसचिव अविनाश महातेकर, केंद्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, केंद्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष भुपेश थुलकर, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळचे चेअरमन राजाभाऊ सरोदे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, रिपाई नेते परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, कामगार आघाडीचे महेश शिंदे, महिला आघाडीच्या चंद्रकांता सोनकांबळे, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहराध्यक्ष अशोक कांबळे, अल्पसंख्याक आघाडीचे अॅड. आयुब शेख, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, बसवराज गायकवाड, संजय सोनवणे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे यांच्यासह राज्यभरातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यंदा १० ते १५ लाख आंबेडकरी जनता आली असून, यावर्षी आंबेडकरी जनतेने, तसेच मराठा समाजाने शांतता पाळल्याबद्दल दोन्ही समाजाचे आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने राज्यातील दलित आणि मराठा समाजाने एकत्र नांदावे. आज दाखविलेला सामाजिक सलोखा दोन्ही समाजाने कायम राखून सलोख्याने व बंधुतेने नांदावे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search