Next
जिंजर रॉजर्स
BOI
Monday, July 16, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून १९४०चं दशक गाजवलेली अभिनेत्री जिंजर रॉजर्स हिचा १६ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये तिचा अल्प परिचय....
......
१६ जुलै १९११ रोजी मिसुरीमध्ये जन्मलेली व्हर्जिनिया कॅथरीन ऊर्फ जिंजर रॉजर्स ही उत्कृष्ट नृत्यांगना, तसेच अभिनेत्री आणि गायिका म्हणून प्रसिद्ध होती. तिच्या व्हर्जिनिया नावाचा उच्चार तिच्या एका चुलत बहिणीला नीट करता येत नसे आणि शेवटी तो जिंजर हाच उच्चार तिचं टोपण नाव म्हणून चिकटला आणि त्याच नावाने ती ओळखली गेली. वयाच्या १५व्या वर्षी नृत्याची एक स्पर्धा जिंकल्यावर तिला ब्रॉडवेवर संधी मिळाली आणि त्यातूनच पुढे १९३० साली तिला ‘यंग मॅन ऑफ मॅनहॅटन’ या सिनेमातून पडद्यावर एन्ट्री मिळाली. त्यातूनच नंतर ‘फ्लाइंग डाउन टू रिओ’मध्ये फ्रेड अस्टेअरबरोबर तिची जोडी जमली. त्यांनी ‘दी गे डायव्होर्स’, ‘टॉप हॅट’, ‘फॉलो दी फ्लीट’, ‘दी स्टोरी ऑफ व्हरनॉन अँड दी आयरिन कासल’ यांसारख्या अनेक संगीतिकांमधून आपल्या नृत्यकौशल्याने बहार उडवून दिली होती. १९४०चं दशक तिने गाजवलं होतं. ‘किटी फॉइल’मधल्या भूमिकेबद्दल तिला ऑस्कर मिळालं होतं. टॉम, डिक अँड हॅरी, दी मेजर अँड दी मायनर, लेडी इन दी डार्क यांसारख्या सिनेमातल्या तिच्या भूमिका गाजल्या होत्या. २५ एप्रिल १९९५ रोजी तिचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला.
....... 

यांचाही आज जन्मदिन :
प्रसिद्ध कथाकार वा. कृ. चोरघडे (जन्म : १६ जुलै १९१४, मृत्यू : एक डिसेंबर १९९५) 
(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
‘चले जाव’ चळवळीत तिरंगा फडकवणाऱ्या प्रसिद्ध क्रांतिकारक अरुणा असफ अली (जन्म : १६ जुलै १९०९, मृत्यू : २९ जुलै १९९६) 
प्रसिद्ध हॉकीपटू धनराज पिल्ले (जन्म : १६ जुलै १९६८) 
हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ (जन्म : १६ जुलै १९८४)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link