Next
आनंदस्वर ज्येष्ठांसाठी
BOI
Wednesday, December 05, 2018 | 09:48 AM
15 0 0
Share this article:

‘जनरेशन गॅप’ हा शब्द नव्या व जुन्या पिढीसंदर्भात वापरला जातो. दोन्ही पिढ्यांमध्ये विचारांचे अंतर हे असणारच आहे; पण अनेकदा वृद्धांचा कुरबुर स्वभाव, सतत अनाहूत सल्ले देणे यामुळे गैरसमजाची ‘गॅप’ वाढत जाते. हे टाळून ‘सेकंद इनिंग्स’ प्रसन्न, आनंदी कशी करता येईल याबद्दल रोहिणी पटवर्धन यांनी ‘आनंदस्वर ज्येष्ठांसाठी’मधून सहज, सोपे मार्गदर्शन केले आहे.

वृद्धांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीचे ‘प्रॅक्टिकल बुक’ असे या पुस्तकाचे वर्णन लेखिकेने केले आहे. साठीनंतर समृद्ध आयुष्य जगण्यासाठीची संकल्पना ‘passion’ या शब्दातून स्पष्ट केली आहे. वृद्धवैद्यकशास्त्र आणि वृद्धाकल्याणशास्त्र याची माहिती, ज्येष्ठांसाठी जादूचा दिवा ठरणारा मोबाइल फोनचा वापर, ज्येष्ठ नागरिक संघाची आवश्यकता, ज्येष्ठ व एकट्या स्त्रियांचे प्रश्न, समाजकार्यात झोकून देणे, ज्येष्ठांनीच ज्येष्ठांना मदत करणे, वृद्धाश्रमांची गरज, त्यांची निवड कशी करावी, परदेशी राहणाऱ्या मुलांच्या पालकांच्या समस्या, मृत्यूला स्वीकारण्याची तयारी व त्याआधी मृत्युपत्र तयार करणे आदी सर्व गोष्टींवर यात मार्गदर्शन केले आहे. जोडीला उदाहरणेही दिली असल्याने ते मुद्दे अधिक जवळचे वाटू शकतात.    

प्रकाशक : रोहन प्रकाशन
पाने : ८४
किंमत : १०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search