Next
अनामिक
BOI
Monday, June 03, 2019 | 10:31 AM
15 0 0
Share this article:

नाती हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि तितकाच गुंतागुंतीचा विषय आहे. त्यामुळे काही बंध ‘सर्वसामान्यांच्या’ चौकटीत न बसल्याने किंवा त्यांना कायद्याच्या भाषेत ठरावीक नाव देता येत नसल्याने अनामिक राहतात. या एकाच सूत्रावर आधारित चार दीर्घकथा वैशाली फाटक-काटकर यांनी ‘अनामिक’ या कथासंग्रहात लिहिल्या आहेत. या कथांमधून एक व्यावहारिक दृष्टिकोन दिसतो. काळाप्रमाणे विचारसरणी बदलली पाहिजे, हा संदेशही यातून दिला आहे. आधुनिक काळातले काही नाजूक प्रश्न सहजतेने मांडून ते समस्या बनण्यापूर्वी, सुसंस्कृत आणि प्रगत विचारसरणीच्या आधारे वेगळ्या प्रकारे हाताळता येतात, याची जाणीव कथा करून देतात. प्रत्येक कथा एका मुख्य विषयावर आधारित असली, तरी ‘तुझ्या-माझ्यात’ ही केवळ प्रेमकथा न राहता अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला लावते. ‘लपंडाव’मध्ये कॉर्पोरेट आणि युवा पिढीचे जग वेगळी दिशा घेताना दिसते. ‘रियुनियन’ ही कथा येणाऱ्या प्रत्येक धूसर वळणावर काय घडणार, याची उत्सुकता वाढवते. ‘गेले... ते दिन गेले!’ या कथेमध्ये आयुष्यातील टप्पे आपल्याला घडवत, जबाबदाऱ्या पेलण्यासाठी खंबीर करतात याची प्रचिती येते.  

पुस्तक : अनामिक
लेखिका : वैशाली फाटक-काटकर
प्रकाशन : अभिषेक टाइपसेटर्स अँड पब्लिशर्स  
पृष्ठे : २३९
मूल्य : २५० रुपये

(‘अनामिक’ हा कथासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search