Next
आयडीबीआय बँकेच्या ऑडिट सिस्टीममध्ये बदल
प्रेस रिलीज
Wednesday, March 28, 2018 | 03:01 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘आयडीबीआय बँके’ने इंटर्नल ऑडिट पद्धत अधिक सक्षम करण्यासाठी व ही पद्धत सध्या उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पद्धतींनुसार ठेवण्यासाठी, ‘क्वालिटी अॅश्युअरन्स ऑडिट’चा (क्यूएए) अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. या हेतूने, बँकेने पीएसबीच्या ऑडिटमधील बदलांशी संबंधित असलेल्या बाहेरच्या तज्ज्ञाची नियुक्ती केली आहे. 

क्यूएएच्या व्याप्तीमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. १) बँकेच्या इंटर्नल ऑडिटच्या स्वरूपाचा आढावा (धोरणे, प्रक्रिया, पद्धती, रिपोर्टिंगचे स्वरूप, फॉरमॅट, इ.) व त्याचे रिस्क बेस्ट सुपरव्हिजनशी एकात्मिकरण २) व्यवसायाची कामगिरी, प्रक्रियांचे पालन, नियमनाचे पालन या बाबतीत बँकेच्या शाखांच्या जोखीमविषयक तीव्रतेतून व्यवसायाशी संबंधित विविध जोखीम मूल्यमापन निकष, महत्त्व, रिस्क वेटेजेस व ऑडिटविषयी निरीक्षणे दिसून येत असल्याची खात्री करण्यासाठी बँकेच्या रिस्क रेटिंग फ्रेमवर्कचा आढावा घेणे ३) बाजारात सध्या वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धती विचारात घेता, इंटर्नल ऑडिटच्या चांगल्या/यशस्वी पद्धती बेंचमार्क करणे, ओळखणे व शिफारस करणे, ४) इंटर्नल ऑडिट प्रोफेशनल पद्धतीने करण्यासाठीच्या मापदंडांच्या पालनाचे मूल्यमापन करणे. 

हा उपक्रम एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे व कार्यपद्धती व व्यवसाय यांची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने, व्यवसायाची उद्दिष्टे, तसेच इंटर्नल ऑडिट सिस्टीम सक्षम करण्यासाठी क्यूएएच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निश्चय बँकेने केला आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search