Next
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हिंजवडीतील समस्यांचा आढावा
BOI
Saturday, August 03, 2019 | 04:10 PM
15 0 0
Share this article:

जिल्हाधिकारी नवल किशोर रामपुणे : हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कच्या वाहतूक, रस्ते व विविध अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकताच येथील समस्यांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार, ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, हिंजवडी, माणचे ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी सुस ते नांदे चांदे रस्ता, घोटवडे फाटा ते हिंजवडी टप्पा तीन येथील टी जंक्शन, वाकड येथील सर्व्हिस रोड पूल, हिंजवडी-माण येथील वाहतूक समस्या, प्रलंबित रस्त्यांची कामे, प्रस्तावित रस्त्यांचे प्रश्न, पायाभूत सुविधा, पार्किंग, वाहतूक व सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search