Next
दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसचा हायटेक प्रचार
मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर
प्रेस रिलीज
Monday, April 08, 2019 | 11:06 AM
15 0 0
Share this article:मुंबई : कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात विजयश्री खेचून आणण्याच्या त्वेषाने उतरलेल्या काँग्रेसने प्रचाराच्या काटेकोर नियोजनासाठी वॉररूम सज्ज झाली आहे. मतदारसंघातील उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या पारंपरिक प्रचारासोबतच होर्डिंग कॅम्पेन, फेसबुक, वॉट्सअप आणि ट्विटरसारख्या सोशल नेटवर्कींग साइट्सच्या माध्यमातून सोशल मीडियावरील हायटेक प्रचाराचा आराखडाही या वॉररूमच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहे.

मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयातर्फे काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या सभांची आणि रोड शोजच्या नियोजनाची माहिती घेऊन त्या अनुषंगाने मतदारसंघातील प्रचाराचे नियोजन करण्याबरोबरच विविध टप्प्यात प्रचाराची दिशा ठरवण्याचे काम या वॉररूममार्फत करण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणचे बुथ वर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठीही या वॉररुमचा वापर करण्यात येणार आहे.लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसने प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. सध्या मतदारांशी थेट संवादावर भर देण्यात असून, चौकसभा आणि पदयात्रांवर भर देण्यात आला आहे; मात्र सध्या फेसबुक, वॉट्सअप आणि ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स निवडणूक प्रचाराचे प्रमुख अस्त्र बनल्या आहेत. विशेषत: तरुण आणि शहरी भागात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने त्या माध्यमातूनही प्रचार करण्याचे नियोजन काँग्रेसने केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार योग्य ती खबरदारी घेत सोशल मीडियाचा वापर करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात येत आहे. या शिवाय काँग्रेसचे कार्यकर्ते, बुथवर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स यांच्याशी समन्वय राहावा यासाठी एक यंत्रणा उभारली जात असून, काँग्रेसच्या वॉररूममार्फत त्याचे संचालन करण्यात येणार आहे. कमी वेळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुयोग्य तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात येणार आहे. एकूणच प्रचाराची सगळी यंत्रणा काँग्रेसने कामाला लावली असून, सोबतच विरोधकांच्या हालचालींवरही नजर ठेवली जात आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा उमेदवार दक्षिण-मध्य मुंबईत फडकवायचाच या त्वेषाने सर्वच कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search