Next
प्रा. नामदेव शिंदे यांना पीएचडी
BOI
Saturday, March 31, 2018 | 04:06 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) गावचे सुपुत्र व रयत शिक्षण संस्थेचे प्रा. नामदेव शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मराठी विषयातील विद्या वाचस्पती (पीएचडी) पदवी देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख, नामवंत कवी, लेखक व समीक्षक आणि सिनेट सदस्य डॉ. मनोहर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. शिंदे यांनी ‘नव्वदोत्तरी ग्रामीण काव्यसंग्रहांतील कृषी संस्कृतीचा अभ्यास’ या विषयावर संशोधन केले.

प्रा. नामदेव शिंदेयापूर्वी त्यांनी एमफिल पदवीही संपादित केली आहे. सध्या ते दहिवडी कॉलेजमध्ये मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. या संशोधनासाठी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. आवलगावकर, डॉ. विद्यागौरी टिळक, डॉ. सांगोलेकर, डॉ. प्रभाकर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

शिवाय कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील प्राचार्य डॉ. सीताराम गोसावी, मराठी विभागप्रमुख डॉ. चांगदेव कांबळे, डॉ. देवानंद सोनटक्के, प्रा. एस. जे. कदम, डॉ. राजाराम राठोड यांच्यासह कोल्हापूर येथील छ. शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, दहिवडी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, मराठी विभागप्रमुख डॉ. एस. बी. वाघमोडे, प्रा. एस. डी. वाघमारे यांचे सहकार्य लाभले.

याशिवाय पंढरपूर येथील साहित्यिक डॉ. वामन जाधव, डॉ. सुशिल शिंदे, प्रा. कुबेर गायकवाड, पुणे येथील डॉ. संदीप कांबळे, बार्शी येथील डॉ. महादेव राऊत यांच्यासह दहिवडी कॉलेजमधील सर्व सहकारी यांचीही मोलाची मदत मिळाली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link