Next
‘डीकेटीई’त ‘झेप २०१८’ची सांगता
प्रेस रिलीज
Wednesday, April 11 | 03:02 PM
15 0 0
Share this story

‘डीकेटीई’मध्ये ‘झेप’ या वार्षिक स्नेहसंमेलनात मार्गदर्शन करीत असताना डॉ. पिल्लाई सीईओ प्रोकलिन इंडिया चेन्नई. शेजारी कल्लाप्पाणा आवाडे, प्रकाश आवाडे, डॉ. पी. व्ही. कडोले आदी मान्यवर.

इचलकरंजी : ‘येथील ‘डीकेटीई’मध्ये उपलब्ध असलेली अत्याधुनिक लायब्ररी, संशोधनासाठी चालना देऊन विद्यार्थ्यांना डिग्री पूर्ण होण्याआधीच जगभरातील अनेक नामांकित कंपन्यामध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे प्लेसमेंट दिल्यामुळे ‘डीकेटीई’ने गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतलेली आघाडी अधोरेखित होते’, असे उद्गार ‘प्रोकलिन इंडिया चेन्नई’चे सीईओ डॉ. एस. सीवारामन पिल्लाई यांनी काढले.  

डीकेटीई इन्स्टिट्यूटमध्ये ‘झेप २०१८’ या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेतर्फे वार्षिक स्नेहसंमेलनाला वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाची सांगता डॉ. एस. पिल्लाई यांच्या उपस्थितीत प्रमुख झाली. या वेळी ‘डीकेटीई’चे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे उपस्थित होते. डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले यांनी या वेळी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.

विद्यार्थ्यांनी जगातील बदलत असणारे तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करावी व नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे,’ असा सल्ला या प्रसंगी डॉ. पिल्लाई यांनी दिला. ‘प्रोकलिन कंपनीमध्ये ‘डीकेटीई’चे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. रासायनिक प्रक्रियेद्वारे केमिकल्सना नैसर्गिक पर्याय उपलब्ध करून देण्याचे पर्यावरणपूरक कार्य सुरू आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

संस्थेचे व्हाईस चेअरमन व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सद्यस्थितीत विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच घ्यावयाची अद्यावत जागतिक स्तरावर घ्यावयाचे प्रशिक्षणाबाबत माहिती सांगून उत्तम भवितव्य घडण्यासाठी विविध प्रकारचे मार्गदर्शन केले. या वेळी ‘अंबर’ या वार्षिकांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. यु. जे. पाटील व डॉ. एल. एस. आडमुठे यांनी विविध स्पर्धेचा निकाल जाहीर केला. शैक्षणिक वर्षात केलेल्या उल्लेखन्नीय कामगिरीबद्दल शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधी गिरीश शिंगे याने वार्षिक अहवाल सादर केला. ‘’

कार्यक्रमास संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे, ट्रस्टी बी. बी. कागवाडे, अशोक सौंदत्तीकर, सर्जेराव पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. ए. व्ही. शहा, प्रा. ए. यु. अवसरे व प्रा. ए. आर. बलवान, विद्यार्थी प्रतिनिधी संकेत बागल, वसुधा बुरसे, भाग्यश्री भोपळे, गणेश बारटक्के, अमोद कुलकर्णी, मंथन चाळके, शुभम कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन पार्थ मर्दा, राजश्री गोस्वामी, ऋषिकेश भत्तड निशा हेमनानी व क्षितीजा कांबळे यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी प्रीतम पाटील यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link