Next
खारबाव येथे आरोग्य शिबिर
मिलिंद जाधव
Monday, October 29, 2018 | 04:31 PM
15 0 0
Share this article:



भिवंडी :
ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या  नुकतेच वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या शिबिरात खारबाव परिसरातील ८४७ रुग्णांची या वेळी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४३ जणांच्या डोळ्यांची, तर ६७ जणांची इतर आजारांच्या सर्जरीसाठी निवड करण्यात आली. १९४ रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. या वेळी सरपंच मोनाताई पाटील, मनोज म्हात्रे, अशोक पालकर, दर्पण पाटील, भरत वतारी, रामदास म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे, मोनिका पानवे, पिंकाजी पडवळे यांनी आरोग्य शिबिराला भेट देऊन पाहणी केली. या वेळी उपस्थितांनी सांबरे यांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search