Next
एका आईची, आजीची कहाणी
BOI
Saturday, August 18, 2018 | 12:05 PM
15 0 0
Share this article:

‘तांबड्या आजीचे सारवलेले अंगण’ ही आयडा बॅरेटो यांनी लिहिलेली कादंबरी. ही कादंबरी एका आईची आहे, नंतर झालेल्या आजीची आहे. एक साधी-सरळ, तुमच्या-आमच्या सर्वांच्या आजीची ती कहाणी आहे. या कादंबरीचा हा अल्प परिचय...
.....
देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी। मना सज्जना हेची क्रिया धरावी।
मना चंदनाचे परी त्वा झिजावे। परी अंतरी सज्जना नीरवावे।
‘तांबड्या आजीचे सारवलेले अंगण’ ही कादंबरी एका आईची आहे, नंतर झालेल्या आजीची आहे. ही सुंदर तांबडी आजी माझ्या जीवनात आयुष्यभर राहिली. तिचे उभे जीवन मी अगदी लहानपणापासून जवळून पहिले आणि अनेक वेळा मला तिच्या निळ्या, घाऱ्या सुंदर डोळ्यांतून मोत्यांसारखे अश्रू घरंगळताना दिसले. 

आणि त्यावेळी मला वारंवार हाच प्रश्न पडत असे, की देव चांगल्या माणसांनाच इतके भोगायला का लावतो? माझ्या तांबड्या आजीचे संपूर्ण जीवन आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबासारखे होते. ते थेंब मातीत पडून जिरून गेले. परंतु ते मातीत पडलेले थेंब या कादंबरीद्वारे कोंबाच्या रूपाने पुन्हा वर फुटले आणि त्या कोंबाद्वारे माझ्या तांबड्या आजीच्या जीवनातील अनेक पैलू उलगडले गेले. 

सर्वसाधारणपणे एखाद्या स्त्रीच्या जीवनात तिला तिच्या मुलांकडून कसल्या अपेक्षा असतात आणि ज्या वेळी तिचा तिच्या मुलांकडून अपेक्षाभंग होतो, त्या वेळी तिला किती दु:खाच्या यातना भोगाव्या लागतात, हे या कादंबरीत दाखविलेले आहे. 

माझ्या तांबड्या आजीलादेखील आपल्या मुलांकडून काही अपेक्षा होत्या. परंतु तिच्या सर्व मुलांनी नेहमी तिचा अपेक्षाभंगच केला. तांबडी आजी आपल्या तरुण मुलांचे अकाली मृत्यू पाहून आपले आयुष्य इतके का वाढले आहे, असे म्हणून व्याकूळ होई. तांबड्या आजीला नियतीपुढे हतबल होऊन कसे खुरडत-खुरडत नाईलाजाने जगावे लागले, हे या कादंबरीवरून वाचकांना कळेल. स्वत:च्या रक्ताच्या नात्यापेक्षा दूर असलेली रूपासारखी एक सामान्य मुलगी तांबड्या आजीच्या हृदयात आपल्या मायेने कसे स्थान मिळविते, हे या कादंबरीतून दिसते. ही कादंबरी म्हणजे एक साधी-सरळ, तुमच्या-आमच्या सर्वांच्या आजीची कहाणी आहे. 

कादंबरी : तांबड्या आजीचे सारवलेले अंगण
लेखिका : आयडा बॅरेटो
पृष्ठसंख्या : ३९०
ई-बुक मूल्य : ३०० रुपये
ई-बुक प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स

(हे ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search