Next
‘आयसीआयसीआय’ची ‘मास्टरकार्ड’शी भागीदारी
प्रेस रिलीज
Monday, October 08, 2018 | 04:18 PM
15 0 0
Share this storyमुंबई : आयसीआयसीआय बँकेने आगामी सणासुदीदरम्यान, आपल्या मास्टरकार्ड क्रेडिट व डेबिट कार्डांचा वापर करणाऱ्या ग्राहकांना लाभ देण्याच्या दृष्टीने ‘स्पेंड अँड विन’ कॅम्पेन दाखल करण्यासाठी मास्टरकार्डशी भागीदारी केल्याची घोषणा केली. ‘एसयुवरस्पेंड्स’ ही कॅम्पेन एक ऑक्टोबर २०१८ ते १० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत मास्टरकार्ड क्रेडिट व डेबिट कार्डांवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या आघाडीच्या प्रत्येकी १० जणांना लाभ देणार आहे. त्यामध्ये ‘ऑस्ट्रेलियन ओपन २०१९’ मधील महिला व पुरुष यांचे अंतिम सामने लाइव्ह पाहण्यासाठी मेलबर्नची तीन दिवस, दोन रात्र अशी ट्रीप जिंकण्याची संधी समाविष्ट आहे.

ग्राहकांना टेनिस ग्रँड स्लॅमसाठी जाण्याची विशेष संधी देणारी ही भारतातील पहिलीवहिली कॅम्पेन आहे. ही कॅम्पेन मुंबई येथे एक ऑक्टोबर रोजी लोकप्रिय भारतीय टेनिसपटू महेश भूपती व अंकिता रैना आणि क्रीडाप्रेमी यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात दाखल करण्यात आली. या निमित्ताने मास्टरकार्ड व आयसीआयसीआय बँक यांचे अधिकारीही उपस्थित होते.

आयसीआयसीआय बँकेचे जनरल मॅनेजर व ग्रुप हेड– अनसिक्युअर्ड लेंडिंग, कार्ड्स अँड पेमेंट्स सोल्यूशन्स, सुदीप्त रॉय म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियन ओपन २०१९चा अंतिम सामना मेलबर्न येथे लाइव्ह पाहण्याचा थरार अनुभवण्याची संधी आमच्या ग्राहकांना देण्यासाठी मास्टरकार्डबरोबर भागीदारी करणारी पहिली बँक असल्याचा आम्हाला आनंद वाटतो. ग्राहकांसाठी जागतिक दर्जाचा व क्रीडा क्षेत्रातला अविस्मरणीय अनुभव सादर करण्यासाठी दोन वैशिष्ट्यपूर्ण ब्रँडचा प्रयत्न या सहयोगाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. आगामी सणासुदीदरम्यान, आमच्या कार्डांचा वापर करून खर्च करण्यास ग्राहकांना उत्तेजन देण्यासाठी ‘एसयुवरस्पेंड्स’ कॅम्पेन आदर्श आहे.’

मास्टरकार्डचे दक्षिण आशियासाठीचे अकाउंट मॅनेजमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष विकास वर्मा म्हणाले, ‘भारतातील सर्वात लोकप्रिय खेळांमध्ये टेनिसचा समावेश आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपन ही एक प्रमुख जागतिक टेनिस स्पर्धा आहे. मास्टरकार्ड कार्डधारकांना मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियन ओपन लाइव्ह पाहण्याचा प्राइसलेस अनुभव देण्यासाठी आयसीआयसीआय बँकेशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आंनद होत आहे. डिजिटल पेमेंट्सना चालना देण्याच्या दृष्टीने आणि ग्राहकांना खेळीमेळीच्या व आरामदायी वातावरणात सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने खेळांशी संबंधित भागीदारी करणे मास्टरकार्डसाठी फायदेशीर ठरले आहे.’

या ट्रीपमुळे विजेत्यांना प्राइसलेस अनुभव मिळणार आहे; तसेच टेनिस विश्वातील दिग्गजांना भेटण्याची, मेलबर्न पार्कमध्ये डिनर करण्याची आणि २६ व २७ जानेवारी २०१९ रोजी खेळल्या जाणाऱ्या पुरुष व महिला यांच्या अंतिम सामन्यामध्ये प्रीमिअम श्रेणीचे तिकीट मिळण्याची संधी मिळणार आहे; तसेच आयसीआयसीआय बँक मास्टरकार्ड क्रेडिट व डेबिट कार्डांद्वारे सर्वाधिक खर्च करणाऱ्या पुढील एक हजार जणांना सवलतीच्या कालावधीदरम्यान केलेल्या खर्चावर दोन हजार रुपये कॅशबॅक मिळेल. ही कॅशबॅक मिळण्यास पात्र ठरण्यासाठी ग्राहकांनी सवलतीच्या कालावधीमध्ये किमान तीस हजार रुपये खर्च करणे गरजेचे आहे.

ही कॅम्पेन म्हणजे, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने हाती घेतलेल्या नव्या उपक्रमांचा एक भाग आहे. यामध्ये जागतिक ब्रँडच्या सहयोगाने निरनिराळ्या क्रेडिट व डेबिट कार्डांचा समावेश आहे. बँकेने होस्ट कार्ड इम्युलेशन (एचसीई) तंत्रज्ञानाच्या मदतीने काँटॅक्टलेस कार्ड दाखल करण्याच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. या तंत्रज्ञानामुळे, बँकेच्या मोबाइल अॅपमध्ये कार्डे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठवून ठेवता येतात. त्यामुळे, ग्राहकांना मोबाइल फोनद्वारे दुकानांत पेमेंट करता येऊ शकते. ग्राहकांसाठी पूर्व-मंजूर ऑनलाइन क्रेडिट कार्ड दाखल करणारी ही पहिलीच बँक असून, ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी कार्डाचा वापर तातडीने करता येऊ शकतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link