Next
सोलापूर जिल्हा परिषदेतर्फे मोबाइल हॅंडवॉश स्टेशन
BOI
Monday, July 16, 2018 | 03:36 PM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटोसोलापूर : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनतर्फे देशातील पहिले मोबाइल हॅंडवॉश स्टेशन तयार केले आहे. ‘पंढरीचे दारी शाश्वत स्वच्छतेची वारी’ या उपक्रमांतर्गत भाविकांच्या सेवेसाठी चार हॅंडवॉश स्टेशन (मोबाइल गाड्या) यंदाच्या आषाढी वारीच्या काळात उपलब्ध करण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते १५ जुलै रोजी या हॅंडवॉश स्टेशनचे उद्‌घाटन झाले. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कार्यकारी अभियंता श्री. कटकधोंड, मनुष्यबळ तज्ज्ञ शंकर बंडगर, सनियंत्रण तज्ज्ञ यशवंती धत्तुरे, प्रशांत दबडे, मुकुंद आकुडे उपस्थित होते. डॉ. भारूड यांच्या संकल्पनेतून कमी खर्चात मोबाइल गाड्या बनविल्या आहेत. लहान वाहने १५ दिवसांच्या कालावधीसाठी भाड्याने घेऊन हॅंडवॉश स्टेशन बनविली गेली आहेत.

‘या वाहनावर सहा वॉश बेसीन बसविली आहेत. हात धुण्यासाठी एक हजार लिटरची टाकी आहे. हात धुतलेले पाणी रस्त्यावर पडू नये म्हणून एक हजार लिटर क्षमतेची टाकी टाकाऊ पाणी साठविण्यासाठी आहे. वाहनावरील स्पिकरच्या माध्यमातून शौचालयाचा वापर प्रचार केला जाणार आहे. व्हॅनला चित्ररथाप्रमाणे सजविले आहे. सांडपाण्याचा उपयोग झाडांना पाणी घालण्यासाठी केला जाणार असून, गोपाळकाल्यापर्यंत ही हॅंडवॉश स्टेशन पंढरपुरात कार्यरत राहणार आहेत,’ असे भारूड यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link