Next
‘एसकेएफ’ संघांचे ‘गोथिया कप’मध्‍ये घवघवीत यश
प्रेस रिलीज
Saturday, July 21, 2018 | 11:54 AM
15 0 0
Share this storyपुणे : गोथिया कपमधील सहभागाच्‍या १०व्‍या पर्वामध्‍ये एसकेएफ इंडियाच्‍या संघांनी प्रथम पात्रता फेरीमध्‍ये उत्‍तम कामगिरी करत घवघवीत यश मिळविले आहे.

एसकेएफ इंडियाचा प्रमुख सीएसआर उपक्रम एसकेएफ स्‍पोर्टस् एज्‍युकेशन प्रोग्रामने ‘गोथिया कप २०१८’मधील १४ वर्षांखालील मुलांचा संघ आणि १२ वर्षांखालील मुलींचा संघ अशा दोन संघांचे प्रायोजकत्‍व स्‍वीकारले आहे. दोन्‍ही संघांनी त्‍यांच्‍या संबंधित गटांमध्‍ये सामने जिंकले आहेत. एसकेएफ इंडिया मुलांचा संघ उपांत्‍यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे. या संघाने अल्म्हल्ट्स आयएफ संघाला ६-१ने पराभूत केले.

ग्रुप १६चा भाग म्‍हणून एसकेएफ इंडिया मुलांच्‍या संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यात मुलांच्‍या संघाने दोन विजय, एक अनिर्णीत व एक पराभव यांसह चार गुण प्राप्‍त केले आहेत. संघाने उत्‍तम खेळ दाखवला आहे. संघातील तुषार, अभिषेक, रोहित व आकिब यांनी सातत्‍याने गोल केले आहेत.

‘एसकेएफ’च्‍या १२ वर्षांखालील मुलींच्‍या संघाने खेळलेल्‍या एकूण चार सामन्‍यांमध्‍ये उत्‍तम कामगिरी दाखवली आहे. या संघाने दोन सामन्‍यांमध्‍ये विजय प्राप्‍त केला आहे आणि दोन सामन्‍यांमध्‍ये संघाचा पराभव झाला आहे. संघाचे आतापर्यंत एकूण सहा गुण झाले आहेत. संघातील अंजली, खूशबू व सपना यांनी विरुद्ध संघांविरोधात सातत्‍याने गोल केले आहेत.

एसकेएफ स्‍पोर्टस् एज्‍युकेशन प्रोग्रामचा क्रीडासारख्‍या प्रबळ माध्‍यमाच्‍या माध्‍यमातून महापालिका शाळांमधील वंचित मुलांचा सर्वांगीण विकास करण्‍याचा उद्देश आहे. पुणे व अहमदाबाद येथे हा प्रोग्राम सुरू आहे; तसेच क्रीडा कौशल्‍ये, पोषणाच्‍या माध्‍यमातून आंतरिक बळ निर्मिती आणि जिंकण्‍याची वृत्‍ती विकसित करण्‍यावर विशेष लक्ष दिले जात आहे.हा प्रोग्राम विद्यार्थ्‍यांना जिल्‍हा, राज्‍य व राष्‍ट्रीय पातळींवरील व्‍यावसायिक खेळाडू म्‍हणून विकसित होण्‍यामध्‍ये मदत करतो. वंचित मुलांना खेळांमध्‍ये व्‍यापक संधी देणे, त्‍यांचा आरोग्‍यदायी विकास करणे आणि त्‍यांना सर्वांगीण शिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्‍य उद्देश आहे. दरवर्षाला ‘एसकेएफ इंडिया’ ‘गोथिया कप’मधील भारताच्‍या दोन संघांना प्रायोजकत्‍व देत मुलांना आंतरराष्‍ट्रीय पातळीवर स्‍पर्धा करण्‍याची संधी देते.

गोथिया कप ही जगातील सर्वात मोठी आणि आंतरराष्‍ट्रीय युथ फूटबॉल स्‍पर्धा आहे. दरवर्षाला ८० देशांमधील जवळपास एक हजार ७०० संघ या स्‍पर्धेमध्‍ये सहभाग घेतात आणि ११० मैदानांवर चार ५०० सामने खेळले जातात. १९७५मध्‍ये गोथिया कपचे पहिल्‍यांदा आयोजन करण्‍यात आले. जगभरातील संघ व सहभागी ही स्‍पर्धा अद्वितीय करतात. ही स्‍पर्धा म्‍हणजे धर्म, जात किंवा राष्‍ट्रीयत्‍वाला बाजूला ठेऊन जगातील युवांसाठी सामान्‍य प्रभुत्‍व म्‍हणून एकत्र येण्‍याचे स्‍थळ आहे.

यंदा दोन्‍ही संघांनी चांगली कामगिरी केली आहे आणि इतर देशांमधील संघांविरूद्ध खेळताना प्रचंड क्षमता व उत्‍तम खेळ दाखवला आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि हा उपक्रम राबवणाऱ्या एसकेएफ सीएसआर संघासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. पुण्‍यामध्‍ये पार्टनर एजन्‍सी पुणे फुटबॉल क्‍लबने (पीएफसी) एसकेएफ स्‍पोर्टस् एज्‍युकेशन प्रोग्रामची अंमलबजावणी केली आहे, तर अहमदाबादमध्‍ये या प्रोग्रामची अंमलबजावणी पार्टनर ‘कहानी’ आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link