Next
विद्याविकास प्रबोधन पुरस्कारांचे वितरण ३० डिसेंबरला
BOI
Saturday, December 29, 2018 | 05:36 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील श्री विद्याविकास सेवा प्रतिष्ठान संचलित शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे विद्याविकास प्रबोधन पुरस्कार वितरण आणि विद्यार्थी, शिक्षक गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ३० डिसेंबर २०१८ रोजी दुपारी २.३० ते ५.१५ या वेळेत नारायण पेठेतील एसएनडीटी कन्याशाळेत होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रॅविट्स फाउंडेशनच्या उषा काकडे भूषविणार असून, एसएनडीटी कन्याशाळेच्या प्राचार्या सुवर्णलता काळे स्वागताध्यक्ष आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सकाळचे मल्हार अरणकल्ले, पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, निरंतरशिक्षण शिक्षणाधिकारी हरूण आत्तार उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी प्रा. गजानन पाटील यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे स्वाहन श्री विद्याविकास सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे निमंत्रक श्रीकांत सुतार यांनी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link