Next
प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाबाबतच्या समस्यांबाबत दोन वर्षांत तोडगा
माधव भांडारी यांची माहिती
BOI
Tuesday, August 28, 2018 | 04:15 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतच्या सर्व समस्यांबाबत येत्या दोन वर्षांत कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, अशी माहिती सोमवारी (२७ ऑगस्ट २०१८) राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत भांडारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी, उजनी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या शेतकरी ग्रामस्थांची यादी डिसेंबर २०१८पर्यंत प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले. 

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे उपस्थित होते.
भांडारी यांनी सांगितले, ‘पुनर्वसनाच्या बाबतीत विस्थापितांच्या समस्या आहेत. या समस्या लवकर सोडवल्या पाहिजेत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि निधीची मागणी करा. पुनर्वसन झालेल्या गावठाणात नागरी सुविधा पुरवल्या जाव्यात. गावठाणांचे रूपांतर ग्रामपंचायतीमध्ये केले जाण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवा.’ 

सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सोलापूर जिल्ह्यात शिबिर आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ज्या शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात जमीन नको असेल, त्यांना स्वेच्छा पुनर्वसनच्या माध्यमातून रोख रक्कम दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी अभियंता आर. के. जगताप, एस. एम. जगताप, एन. व्ही . जिवणे, बाळासाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, मोहिनी चव्हाण, प्रवीण साळुंके आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link