Next
भर पावसातही साधला कुर्डुवाडीच्या जनतेशी संवाद
प्रेस रिलीज
Monday, April 09, 2018 | 02:51 PM
15 0 0
Share this story

भर पावसात जनतेशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार.कुर्डुवाडी (सोलापूर) : वैराग येथील भव्य सभा आटोपून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारदादा, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे कुर्डुवाडी येथील सभेला निघाले; मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सभा होणार की नाही, असे वाटत असतानाच अजित पवार यांनी भरपावसात उभे राहून कुर्डुवाडीच्या जनतेशी संवाद साधत सरकारवर हल्लाबोल केला.

सात एप्रिलला वैरागची सभा संपल्यावर दिवसातील शेवटची सभा कुर्डुवाडी येथे होणार होती. या हल्लाबोलच्या जाहीर सभेला पवार, तटकरे आणि मुंडेना ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येंने जनसमुदाय उपस्थित होता. वैरागच्या सभेतच वेळ झाला असतानाही आणि पाऊस पडत असतानाही सभेला जमलेल्या कार्यकर्त्यांना नाराज न करता आपल्यासाठी थांबलेल्या जनसमुदायासाठी अजित पवारांनी भाषण केले. त्याअगोदर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पावसात भिजतच संवाद साधला.

धनंजय मुंडेपूर्वनियोजित जाहीर सभा असल्याने ही सभा होणारच होती; परंतु या सभेपूर्वीच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या सभेवर पाणी फिरते की काय, असे सर्वांनाच वाटले होते; परंतु अजित दादांनी आपल्यासाठी भरपावसात थांबलेल्या जनतेला निराश केले नाही. त्यांनी भरपावसात जनतेला संबोधित केलेच शिवाय सरकारच्या कारभारावर आसूढ ओढले.

पावसातही हल्लाबोल आंदोलनाला उपस्थित जनसमुदायया सभेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील, ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील, खासदार विजयसिंह मोहितेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, महिला नेत्या रश्मी बागल, आमदार दीपक सोपल, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, आमदार जयदेव गायकवाड, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, विदयार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे आदींसह कुर्डुवाडी आणि परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link