Next
‘येस बँके’ची ‘एनएसएफआय’ भागीदारी
प्रेस रिलीज
Friday, May 11 | 02:02 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : येस बँकेने राजस्थान व हरयाणा येथील १५ जिल्ह्यांमधील अंदाजे दहा हजार शेतकऱ्यांना गुड अॅग्रिकल्चर प्रॅक्टिसेसवरील (जीएपी) कार्यशाळा, डिजिटल बँकिंग उपक्रम, तसेच आर्थिक समावेशकता व डिजिटल साक्षरता उपलब्ध करण्यासाठी नॅशनल स्किल्स फाउंडेशन ऑफ इंडियाशी (एनएसएफआय) भागीदारी केली आहे.

एनएफएसआय व येस बँक येथील तज्ज्ञ ३०-४० अशा बॅचमध्ये प्रशिक्षण घेणार असून, त्यामध्ये संवादात्मक व्हिज्युअल व ऑडिओ माध्यमे, केस व्हिडिओ, हाउ-टू गाइड्स व तपशीलवार प्रेझेंटेशन्स यांचा वापर समाविष्ट आहे. या कार्यशाळांमार्फत, बँकेचे उद्दिष्ट ‘२०२०पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे’ हे आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाचे एकत्रित उद्दिष्ट व त्यासाठी आर्थिक समावेशकता, डिजिटल साक्षरता आणि गुड अॅग्रिकल्चर प्रॅक्टिसेस (जीएपी) हे तीन दृष्टिकोन महत्त्वाचे आहेत.

या निमित्त बोलताना येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि येस ग्लोबल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष राणा कपूर यांनी सांगितले, ‘देशातील लोकसंख्येला आर्थिक व्यवस्थेमध्ये किती प्रमाणात समाविष्ट करून घेण्यात आले आहे, यावर कोणत्याही देशाची शाश्वत वाढ अवलंबून असते. सरकारने कृषी समुदायामध्ये आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी अनेक उपाय अवलंबले असून, त्या अनुषंगाने शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टीने पाहण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. आर्थिक समावेशकतेला व समावेशक प्रगतीला आणखी चालना देण्यासाठी आर्थिक शिक्षण देणे गरजेचे आहे.’

‘समावेशक आर्थिक व्यवस्था निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, तसेच ग्रामीण घराघरातील आकलनविषयक व संसाधनविषयक मर्यादा लक्षात घेऊन, २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे व अन्नसुरक्षेची तरतूद करणे या देशव्यापी उद्देशासाठी गरजेचे असलेले प्रयत्न करण्यासाठी येस बँक व ‘एनएफएसआय’ उत्सुक आहेत,’ असे कपूर यांनी स्पष्ट केले.

उदयोन्मुख उद्योजकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास पाठबळ देण्यासाठी येस बँक प्रयत्नशील आहे व याच प्रयत्नाचा भाग म्हणून, बँक स्टार्ट-अप्सना व प्रामुख्याने देशातील अन्नधान्य व शेती व्यवस्था यावर परिणाम साधणाऱ्या स्टार्ट-अप्सना चालना देणे, मार्गदर्शन करणे व पाठिंबा देणे यासाठी काकर्यरत आहे. वर्ल्ड फूड इंडिया २०१७ (अन्न प्रक्रिया उद्योगाच्या नेतृत्वाखाली), अॅग्री उडान २.० (ICAR-NAARM & DST याचे फूड अँड अॅग्री अॅक्सिलरेटर) आणि ‘TERI WSDS’ अशा सरकारच्या प्रमुख उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होऊन, सध्या असलेल्या, या उद्योगातील पहिल्या, इन-हाउस अॅग्री नॉलेज बँकिंग कौशल्यामध्ये वाढ होईल, असे बँकेला वाटते.

येस बँकेने ग्लोबल एंटरप्रिन्युअरशिप समिटच्या (जीईएस) रोड टू जीईएस मालिकेचा भाग म्हणून २०१७मध्ये पहिल्या ‘#फ्युचरअॅग्रिटेक’ समिटचे आयोजन केले होते व त्यामध्ये बँकेने अनेक संवाद व चर्चा याद्वारे उद्योजकतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यातील स्वारस्य वाढवले आहे. कृषी अर्थसहाय्य व नाविन्य यामध्ये आघाडीचे स्थान निर्माण केल्यानंतर, येस बँकेने महत्त्वाचे उपक्रम व आधारात्मक यंत्रणा याद्वारे या क्षेत्रामध्ये नाविन्य व उत्पादकता यामध्ये वाढ करायचे ठरवले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link