Next
माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
BOI
Wednesday, July 18, 2018 | 10:39 AM
15 1 0
Share this story

सोलापूर : ‘ध्यास हा जिवाला पंढरीशी जाऊ। पंढरीचा राणा डोळे भरून पाहू’ असे म्हणत आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे काल (१७ जुलै) सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री विजय देशमुख यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून स्वागत केले.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभाला आमदार हणमंतराव डोळस, परभणीचे खासदार संजय जाधव, माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, प्रांत अधिकारी शमा ढोक-पवार, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते आदी उपस्थित होते.

माऊलींची पालखी सकाळी १०.४५च्या सुमारास धर्मपुरी येथे आली. तत्पूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला. 

पालखी अगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात धर्मपुरी येथे पर्यावरण निर्मल वारी पथक, पोलीस प्रबोधन पथक सहभागी झाले होते. तसेच भारुड, प्रवचन यांसारख्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये जागृती  करण्यात आली. पालखीचे आगमन झाल्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी पालखीसमवेत चालण्याचा आनंद घेतला. धर्मपुरी येथे विसावा घेऊन माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातल्या पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे रवाना झाली.

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दत्त टेलर , सोलापुर About 218 Days ago
छान बातमी आहे .
0
0

Select Language
Share Link