Next
गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळविण्यात ‘डीकेटीई’ची आघाडी
प्रेस रिलीज
Friday, September 07 | 03:58 PM
15 0 0
Share this story

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने गुणवत्ता शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभात कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ‘डीकेटीई’चे प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले व त्यांचे सहकारी यांचा सत्कार करण्यात आला.

इचलकरंजी : शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती उपक्रमात वर्ष २०१७-२०१८ मध्ये ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाईल अॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिटयूटने अभियांत्रिकी विद्याशाखातून निमशहरी गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून त्यांना शिवाजी विद्यापीठातर्फे गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्यात येते. 

याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते संस्थेचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील  व प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांनी हा सत्कार स्विकारला. 

या वेळी डॉ. कडोले म्हणाले, ‘ज्ञान संस्कारातील प्रोत्साहनासाठी शिष्यवृत्ती हे उत्तम माध्यम आहे. या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, त्यांना सहकार्य करणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हा उद्देश आहे. ‘डीकेटीई’ने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी आणि त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. गेली छत्तीस वर्षे संस्थातज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांद्वारे हे कार्य करत आहे. त्याचीच परिणीती ‘डीकेटीई’च्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती पटकावण्यात झाली आहे. निमशहरी विभागात ‘डीकेटीई’चे सर्वाधिक विद्यार्थी आहेत. ‘डीकेटीई’ने आपली शैक्षणिक गुणवत्ता शिवाजी विद्यापीठात सिध्द केलेली आहे. 

संस्थेने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व विश्वास्त यांनी प्राचार्य डॉ. कडोले व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link