Next
सोमनाथ मंदिर स्वच्छतेत देशात पहिल्या क्रमांकावर
‘बीव्हीजी इंडिया’ची यशस्वी कामगिरी
BOI
Friday, September 06, 2019 | 05:15 PM
15 0 0
Share this article:


पुणे : गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिर हे देशातील सर्वात स्वच्छ मंदिर ठरले असून, पुण्यातील बीव्हीजी इंडिया या कंपनीकडे या मंदिराच्या देखभालीचे काम आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत या मंदिराला ‘सर्वात स्वच्छ मंदिर’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी टिव्टर संदेशाद्वारे सोमनाथ मंदिराच्या पुरस्काराबाबत माहिती दिली आहे. ‘जलशक्ती आणि स्वच्छता मंत्रालयाने जाहीर केलेल्या या पुरस्कारामुळे राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या निकषांचे काटेकोरपणे पालन करून सोमनाथ देशातील सर्वात स्वच्छ मंदिर ठरले आहे. वर्षाचे ३६५ दिवस सोमनाथ मंदिर स्वच्छ ठेवण्यात बीव्हीजी इंडियाने घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे,’ असे रूपानी यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारांचे वितरण दिल्लीत होणार आहे.

गुजरातमधील सर्व तीर्थस्थळांच्या स्वच्छतेची मोहीम राज्य सरकारने २०१७ मध्ये हाती घेतली होती. विविध मंदिरांमध्ये सोमनाथ, गिरनार, द्वारका, अंबाजी, पलितना, पावागड, श्यामलजी आदींचा समावेश आहे. यातील सोमनाथ व द्वारका येथील मंदिरांच्या देखभालीचे काम बीव्हीजी इंडियाकडे सुपुर्द करण्यात आले. तेथील उत्तम काम पाहून स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसराच्या देखभालीचे कामही सरकारने बीव्हीजी इंडिया कंपनीला दिले आहे.

हणमंतराव गायकवाड
‘बीव्हीजी इंडियाने स्वच्छतेच्या बाबतीत देशात निर्माण केलेल्या अत्युच्च मापदंडांवर या पुरस्काराने मोहर उमटवली आहे. देशाची स्वच्छता करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठी बीव्हीजी इंडिया अहोरात्र प्रयत्नशील आहे,’ अशी प्रतिक्रिया कंपनीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search