Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात साक्षरता दिन
प्रेस रिलीज
Tuesday, September 11, 2018 | 04:29 PM
15 0 0
Share this article:औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटचे डॉ. के. एन. भावले, पुणे विद्यापीठाचे डॉ. धनंजय लोखंडे आणि डॉ. विलास आढाव उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. लोखंडे म्हणाले, ‘अनौपचारिक शिक्षणामुळे औपचारिक शिक्षणाला बळकटी मिळते. डॉ. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून विविध जाती-जमातींमधील मुलांसाठी वस्तीगृह बांधून मुलांना स्वावलंबी शिक्षण दिले. तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवून त्यांना साक्षर बनविले. आजही ही शिक्षण संस्था समाजाभिमुख दृष्टिकोन ठेऊन सामाजिक बांधिलकी जोपासताना दिसत आहे.’

डॉ. आढाव म्हणाले, ‘महाराष्ट्राला वैचारिक चळवळींचा वारसा लाभलेला आहे. पुणे विद्यापीठात आजीवन अध्ययन व अध्यापन विभागामार्फत समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचे कार्य केले जात आहे. आता फक्त लिहिता-वाचता येऊन चालणार नाही. त्याचबरोबर आर्थिक, आरोग्य विषयक, कायदा विषयक, सविधान विषयक ज्ञानाबाबत आपण साक्षर असायला हवे.’

डॉ. नवले म्हणाले, ‘ज्याला अक्षरांची किमया समजते त्याला साक्षर समजावे. साक्षरतेच्या विकासाला जागतिक पातळीवर एक पार्श्वभूमी आहे. ग्लोबल ते लोकल असे त्याचे स्वरूप आहे. वर्गातील शिक्षणापेक्षाही आपण समाजात अनेक गोष्टी शिकतो. क्षणाक्षणाला ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने आपण जे शिकतो ते खरे शिक्षण होय. आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत शिकत असतो. म्हणजे आपण आजीवन ज्ञान ग्रहण करीत असतो. युनोस्कोने आठ सप्टेंबर १९६६ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला. त्यानंतर प्रत्येक वर्षी एक विषय घेऊन समाजाला साक्षर करण्याचे कार्य युनोस्को करीत आहे. सन २०१८-१९ यावर्षी ‘साक्षरता आणि कौशल्य विकास’ हा विषय घेऊन समाजाला साक्षर करण्याचे कार्य जागतिक पातळीवर सुरू आहे.’

‘रयत शिक्षण संस्थेने स्किल डेव्हलपमेंट कोर्स सुरू करून खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला आहे. शाश्वत साक्षरता विकासासाठी माणसाने पर्यावरण,  साधनसंपत्ती, तंत्रविज्ञान, संसार, जमीन, पाणी, राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शासकीय योजना, उर्जाबचत कौशल्य, कायदा साक्षरता, अर्थसाक्षरता, मतदार साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, व्यसनाधीनता, संयम साक्षरता इतर गोष्टींमध्ये साक्षर असणे गरजेचे आहे,’ असे डॉ. नवले यांनी सांगितले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘सन २०१९मध्ये रयत शिक्षण संस्था शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यामुळे शताब्दीपूर्ती वर्षानिमित्त सर्व शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम रयत शिक्षण संस्था राबवित आहे.’

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, डॉ. तानाजी हातेकर, प्रा. नलिनी पाचर्णे, डॉ. हर्षद जाधव, प्रा. किरण कुंभार, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vilas Adhav About 342 Days ago
The programme was coordinated very well. I extend my sincere thanks to all teaching and non-profit teaching staff and, Specially thanks to Dynamic Economist and academic Leader Dr. Manchester Bobade. With regards. Vilas Adhav, Savitribai Phule Pune University.
0
0

Select Language
Share Link
 
Search