Next
पुण्यात चित्रप्रदर्शन व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, October 22 | 04:33 PM
15 0 0
Share this story

भाग्यश्री गोडबोलेपुणे : चित्र आणि संगीत या दोन कलांचा मिलाफ साधून राधा आणि कृष्णाचे नाते पुन्हा एकदा नव्याने अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे पुण्यातील आविष्कार क्रिएशन्सतर्फे आयोजित ‘मधुर सुरांतून चित्र बोलते...’ या अनोख्या चित्रप्रदर्शन आणि सांगीतिक कार्यक्रमाचे.

मॉडेल कॉलनी येथील रवी परांजपे आर्ट स्टुडिओ येथे २७ व २८ ऑक्टोबर २०१८ रोजी हे कार्यक्रम सादर होणार आहेत.  चित्रप्रदर्शनी व सांगीतिक कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असणार आहे. राधा-कृष्ण हे सुंदर नाते कलांच्या अनेक माध्यमांतून आजवर आपल्या सर्वांच्या समोर आले आहे; मात्र चित्र आणि संगीत दोन कलांच्या संगमातून हे नाते पुन्हा एकदा रसिकांसमोर नव्याने उलगडणार आहे.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कलाकार भाग्यश्री गोडबोले यांची राधा-कृष्ण यांवरील अॅक्रिलिक माध्यमातील विविध मिनिएचर पेंटिंग्सचे प्रदर्शन २७ व २८ ऑक्टोबरला रवी परांजपे आर्ट स्टुडिओ येथे सकाळी १० वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत नागरिकांना पहाता येणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध गायक पंडित संजीव शेंडे आणि सुप्रसिद्ध चित्रकार श्रीकांत प्रधान यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होईल.

दोन दिवसाच्या या प्रदर्शनाचा समारोप हा स्वत: भाग्यश्री गोडबोले यांनी आपल्याच मिनिएचर पेंटिंग्सवर रचलेल्या शास्त्रीय संगीतातील बंदिशींच्या सादरीकरणाने होईल. या वेळी प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे-साठ्ये व पंडित रघुनंदन पणशीकर हे या बंदिशी सादर करतील. त्यांना भरत कामत हे तबल्यावर, तर राहुल गोळे हे संवादिनीवर साथसांगत करतील. डॉ. माधवी वैद्य कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करतील.

प्रदर्शन व उद्घाटनाविषयी :
दिवस :
२७ व २८ ऑक्टोबर २०१८ रोजी हे
उद्घाटन वेळ : सकाळी १० वाजता
प्रदर्शनाची वेळ : सकाळी १० ते रात्री आठ वाजेपर्यंत
स्थळ : रवी परांजपे आर्ट स्टुडिओ, मॉडेल कॉलनी, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link