Next
आविष्कार नृत्य अकादमीचा अरंगेत्रम कार्यक्रम सादर
प्रेस रिलीज
Thursday, June 21 | 04:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : भरतनाट्यम गुरु सीमा वाघ यांच्या शिष्या शांभवी नाबर आणि मृण्मयी पटवर्धन यांचा ‘शिवोहम’ या संकल्पनेवर आधारित अरंगेत्रमचा कार्यक्रम नुकताच येथे सादर झाला.

कावेरी हायस्कूल येथील शाकुंतल सभागृहात पार पडलेल्या या नृत्याविष्काराची सुरुवात शिव पुष्पांजलीच्या सादरीकरणाने झाली. कल्याणी रागातील जतीस्वरम, नवराग मालिकेतील वर्णमंचे सादरीकरण, शिवकथा, देवी सती आणि प्रजापती वाद, शंकराचा रुद्रावतारातील तांडव, शंकर पार्वतीचा निंदा स्तुती विवाह या रचनांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी दाद दिली.

यानंतर मृण्मयी पटवर्धन यांनी सादर केलेला मेघदूत या मूळ संस्कृत काव्य आणि त्याचा इंग्रजी अनुवाद आणि नृत्य प्रस्तुती असा अनोखा मिलाफ रसिकांना या वेळी अनुभवता आला. कार्यक्रमाची सांगता तिल्लाना आणि मंगलमया नृत्य प्रकाराने झाली.

या कार्यक्रमासाठी नंदिनी गुजर यांनी गायनाची साथ केली. श्री व्यंकटेश यांनी मृदुंग, श्री बालसुब्रह्मण्यम यांनी व्हायोलीन आणि सीमा वाघ यांनी नटूवांगमची साथ केली. उत्तरार्धात मीरा रानडे, ओजस बसर्गेकर, चिन्मय वाघ, यश सोमण आणि रोहित कुलकर्णी यांनी गायन आणि वादनाची साथ केली. या कार्यक्रमासाठी पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव कॅप्टन डॉ. चंद्रशेखर चितळे, गुरु सई शेट्ये, सारस्वत बँकेचे व्यवस्थापक रत्नाकर पत्की उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link