Next
‘डीएचएफएल’च्या रोखे विक्रीला मंगळवारपासून सुरूवात
प्रेस रिलीज
Monday, May 21 | 02:56 PM
15 0 0
Share this story

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल)  एनसीडी इश्यूची घोषणा करताना कंपनीचे ट्रेझरी प्रमुख भारत पारिक आणि प्रदीप भदुरीया.

पुणे : दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) या नोंदणीकृत आघाडीच्या खासगी हाऊसिंग फायनान्स कंपनीने प्रत्येकी एक हजार रुपये दर्शनी मूल्य असलेल्या तीन हजार कोटी रुपयांच्या सिक्युअर्ड रीडीमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स अर्थात रोखे  (एनसीडी) दाखल केले असून, मंगळवारी, २२ मे पासून त्यांच्या विक्रीला सुरूवात होणार आहे. 
 
याबाबत अधिक माहिती देताना डीएचएफएलचे ट्रेझरी हेड भारत पारीक म्हणाले, ‘हा इश्यू आणखी नऊ हजार कोटी रुपयांपर्यंत ओव्हरसबस्क्राइब करण्याचा पर्याय असून, एकूण बारा हजार कोटी रुपयांच्या १२ कोटी ‘एनसीडीज’चा हा इश्यू आहे. तीन, पाच, सात आणि दहा वर्षे अशी मुदत यासाठी असून, त्यानुसार या रोख्यांवर वार्षिक ९.१० टक्के पर्यंत आकर्षक व्याजदर देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ०.१० टक्के व्याज देण्यात येणार आहे.’ 

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर या रोख्यांचे वाटप केले जाणार आहे. तो चार जून रोजी बंद होणार असून, इश्यू लवकर बंद करण्याचा किंवा त्याला वाढीव मुदत देण्याचा पर्याय कंपनीला उपलब्ध आहे. केअर रेटिंग्ज लिमिटेड आणिब्रि कवर्क रेटिंग्ज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडूनही ट्रिपल ए रेटिंग मिळाले आहे’, असेही पारिक यांनी सांगितले.  

ते पुढे म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांमध्ये, डीएचएफएल अतिशय स्पर्धेच्या स्थितीतही उल्लेखनीय प्रगती करत आहे. २०२२ पर्यंत सर्वांना घरे पुरवण्याचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये योगदान देण्यासाठी कंपनी सक्रियपणे काम करत आहे. या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये ही तिसरी एनसीडी विक्री डीएचएफएलच्या भविष्यातील नियोजनाला मोठी चालना व बळ देणार आहे. यातून मिळणारी रक्कम ही कर्ज वितरण वाढवण्यासाठी; तसेच कंपनीवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.’ 

‘गुंतवणुकदारांना किमान दहा हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर एकच्या पटीत अर्ज करता येईल. गुंतवणूकदारांना डीमटेरिअलाइज्ड किंवा भौतिक स्वरूपातील एनसीडींसाठी अर्ज करण्याची सुविधा असेल.  या रोख्यांची  नोंदणी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर होणार असल्याने, ग्राहक केव्हाही डीमॅट स्वरूपातील रोखे विकू शकतात’, असेही पारिक यांनी नमूद केले. या वेळी  कंपनीचे रिटेल लायबिलिटी विभागाचे प्रमुख प्रदीप भदुरीया उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link