Next
‘त्यांनी’ लुटला बालदिनाचा आनंद
प्रेस रिलीज
Wednesday, November 14 | 04:47 PM
15 0 0
Share this story



पुणे : स्वतःच्या हातावर टॅटू काढून घेऊन, पिझ्झा-बर्गर, केकचा आस्वाद लुटत आणि धम्माल मस्ती करत विशेष मुलांनी बालदिनाचा आनंद लुटला.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी बालदिन साजरा केला जातो. स्वतःच्याच जगात रममाण असणाऱ्या या मुलांना आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींतून आनंद लुटता यावा, या हेतूने पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्र परिवारातर्फे दर वर्षी बालदिनानिमित्त विशेष मुलांसाठी पार्टीचे आयोजन केले जाते. यंदाही जंगली महाराज रस्त्यावरील मॅक्डोनाल्डस येथे या विशेष मुलांसाठी खास पार्टी झाली.



माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत या विशेष मुलांनी केक कापून पंडित नेहरू यांचा जन्मदिन साजरा केला. या वेळी बालचमूसाठी टॅटू पेंटिंग, पेन्सिल स्केचची व्यवस्था करण्यात आली होती. टॅटू आणि स्केच काढून घेण्यात आणि ते पाहण्यात ही मुले हरखून गेली होती. ‘यलो’ चित्रपटात अभिनय करणारी व राष्ट्रपती पुरस्कार विजेती गौरी गाडगीळ, कथ्थक नृत्यात निपुण ठरलेली सायली अगावणे या विशेष मुलींची या वेळी उपस्थिती होती.



या प्रसंगी संयोजक अमित बागुल, पुणे नवरात्र महोत्सवाचे पदाधिकारी रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, अभिषेक बागुल, महेश ढवळे, सागर आरोळे, धनंजय कांबळे, सतीश कांबळे, सुरेश कांबळे, सन्मित चौधरी, बाबालाल पोळके, इम्तियाज तांबोळी, सुनील लोखंडे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link